भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार यादवेंद्र सिंह यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. यादवेंद्र सिंह हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते, ते भोपाळच्या एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आज शनिवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. यादवेंद्र सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांचे पार्थिव रात्री उशिरापर्यंत त्यांच्या सतना येथील निवासस्थानी पोहोचेल.
यादवेंद्र सिंह हे सतना जिल्हयातील नगौद विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार होते. ते नागौदमधून काँग्रेसच्या तिकीटावर आमदार निवडून आले होते. त्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानंतर भाजपसह काँग्रेसने देखील दु:ख व्यक्त केले आहे.
यादवेंद्र सिंह यांचा राजकीय प्रवास खडतर होता. 5 जून 1953 साली गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा राजकीय प्रवास हा 1978 मध्ये सुरू झाला. त्यावेळी ते पहिल्यांदाच सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात देखील काम केले. 1993 मध्ये ते पंचायत समितीचे उपाध्यक्ष ही झाले आणि 1999 मध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1998 मध्ये त्यांनी बस चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2003 मध्ये काँग्रेसने त्यांना आमदारकीची उमेदवारी दिली आणि मात्र त्यांचा पराभव झाला. 2013 ला पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2018 ला त्यांचा कमी मताने पराभव झाला.
2023 ला काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले त्यानंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. यामुळे काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर जावा लागले. 2024 ला लोकसभा निवडणुकीदरम्यान यादवेंद्र सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.