Horrific Accident : बाळाच्या जन्माने कुटुंब आनंदात; घरी जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ३ दिवसांच्या बाळासह चौघांचा मृत्यू

Horrific Accident in Uttarakhand : उत्तराखंडात भीषण अपघातात ३ दिवसांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Uttarakhand accident
Horrific Accident in Uttarakhand Saam tv
Published On

महिलेने गोंडस बाळाला जन्म देऊन तीन दिवस झाले होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुटुंब बाळासहित कारने घरी निघालं. मात्र, घरी परतताना काळाने कुटुंबावर घाला घातला. भीषण अपघातात तीन दिवसांच्या बाळासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Uttarakhand accident
Property Rates in Mumbai : मुंबईत घर हवंय...109 वर्षे थांबा...! आता स्वप्ननगरीत घर म्हणजे एक दिवास्वप्न? VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील सुशीला तिवारी रुग्णालयात महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिला कुटुंबासह कच्छा येथे निघाली. मात्र, कच्छाला जाणाऱ्या कुटुंबाची कार कालव्यात कोसळली. बाजार समितीसमोरील कालव्यात बुधवारी सात वाजता ही कार कोसळली. या दुर्देवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

Uttarakhand accident
Latur Women Constable : दीड दमडीचा वकील; लातुरातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ

अपघातात आईचा जीव वाचला आहे. परंतु तीन दिवसांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत बाळाच्या वडिलांचाही मृत्यू झाला. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या विभागाने रेस्क्यू अभियान राबवण्यास सुरुवात केलं. अभियान राबवताना अग्निशमन विभागाचा कर्मचारी कालव्यात वाहून जात होता. मात्र, त्याने जीवाची बाजून लावून स्वत:चा जीव वाचवला. तसेत कारमधील चालकाचाही जीव वाचवला.

Uttarakhand accident
Wednesday Horoscope : जोडीदाराची आरती ओवाळावी लागणार, गुप्तशत्रू वाढतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार नवं संकट

हिंगोलीत भीषण अपघात; दोघांचे पाय निकामी

हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात पिकप वाहन आणि दुचाकी अपघातात दोघांनी पाय गमावल्याची घटना घडली. जिल्हा सरकारी कामगार कार्यालयाच्या परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पिकप आणि वाहनाने कट मारल्याने अपघात घडला. दुचाकी सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळल्याने दुचाकीवरील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. तसेच पोलिसांनी जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com