Property Rates in Mumbai : मुंबईत घर हवंय...109 वर्षे थांबा...! आता स्वप्ननगरीत घर म्हणजे एक दिवास्वप्न? VIDEO

home in Mumbai : महानगरी मुंबईत घरांच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. सध्या अनेकांना मुंबईत घर विकत घेणे दिवास्वप्न ठरणार आहे.
Property Rates in Mumbai
home in MumbaiSaam tv
Published On

मुंबईत घर असावं हे अनेकांचं स्वप्न... मात्र आता हे स्वप्न सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहण्याची शक्यता आहे... कारण मुंबईत कुटुंबासाठी घर घ्यायचं असेल तर तब्बल 109 वर्षे वाट बघावी लागणार आहे.. नॅशनल हाऊसिंग बोर्डाच्या घराच्या किंमती, उपनिबंधक कार्यालय आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांच्या डेटावरुन ही बाब समोर आलीय.. या आकडेवारीवरुन कोणत्या शहरात घर घेण्यासाठी किती वर्षे बचत करावी लागण्याची शक्यता आहे? पाहूयात...

Property Rates in Mumbai
Latur Traffic Police Controversy : झिपरे बोलून कानफटात देणे पडलं महागात; ३ तरुणींची मारकुट्या कॉन्स्टेबलविरोधात पोलिसांत धाव

राष्ट्रीय गृहनिर्माण बोर्डाकडून घरांच्या तीन प्रकारच्या आकाराचं डेटा संकलन

मुंबईतील कुटुंबांच्या 5 टक्के बचतीची 110 चौरस मीटरच्या किंमतीशी तुलना

5 टक्के बचत आणि जीडीपीच्या तुलनेतून किंमतीचा अंदाज

प्रति कुटुंब 10 लाख वार्षिक उत्पन्न असल्यास 5 टक्क्यानुसार 3.2 लाखांची बचत

मुंबईत 1 हजार 184 चौरस फूट घराची किंमत 3.5 कोटी

त्यामुळे घर घेण्यासाठी 109 वर्षे लागण्याची शक्यता

Property Rates in Mumbai
Mumbai Railway : रेल्वे अपघातात 22 वर्षांत 72,000 मृत्यू; सुन्न करून टाकणारा रिपोर्ट आणि कारणं

हेच प्रमाण हरियाणात 50 वर्षे, बंगळूरमध्ये 36 तर दिल्लीत 35 वर्षे असे आहे. त्यामुळे देशातील सगळ्यात महाग घरं मुंबईत असल्याने आजोबाच्या घराचं स्वप्न नातवालाच पूर्ण करावं लागण्याची शक्यता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com