उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ओव्हरटेक करत असताना त्यांचा कार डिव्हायडरला धडकली. हल्दवानी वरून काशीपूरकडे जात असताना बुधवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास ही घटना घडली.
हरीश रावत यांच्यावर सध्या काशिपूरच्या केवीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आहेत. रावत यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाहनातील चालक आणि गनर देखील थोडक्यात बचावले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माजी मुख्यमंत्री हरीश रावत हल्दवानीहून काशीपूरला त्यांच्या फॉर्च्युन कारने जात होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांची कार दुभाजकाला धडकली. गाडी वेगात असल्याने कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने रावत यांना सीएचसीमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना पाठवलं. (Live Marathi News)
सीओ भूपेंद्र सिंह भंडारी यांनी माजी मुख्यमंत्री रावत यांना त्यांच्या कारमधून काशीपूर येथील केव्हीआर रुग्णालयात नेले. उपचारानंतर माजी मुख्यमंत्री रावत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.