Raigad News : 'सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना वेदना होतात, सरकारला आता तरी कळेल का?' आर्थिक विवंचनेतून शिक्षकाची आत्‍महत्‍या

Teacher End Life : अजून खूप जगावसं वाटत होतं. पण वेळेवर पगार नाही, जगावं कसं हेच कळत नाही.
Raigad News
Raigad NewsSaam TV
Published On

सचिन कदम

Raigad News :

आर्थिक विवंचनेतून शिक्षकाने विष पित आपलं जीवन संपलं आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. महादेव जानू वारगुडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे वारगुडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्‍याचे त्यांना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raigad News
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेटचे जाळे देशभर, आणखी एका फार्मा कंपनीची झडती

तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, अन्यथा पगारात वाढ करा, नायतर माझ्यासारखी प्रत्‍येकावर ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात, हे सरकारला आता तरी कळणार आहे की नाही, असा सवाल देखील त्‍यांनी उपस्थित केला आहे. (Live Marathi News)

Raigad News
Accident News : दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या २ बसला शहापूरजवळ अपघात, २५ जण जखमी

सोशल मीडिया पोस्ट

'तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, पगारात वाढ करा. नाहीतर माझ्यासारखी वेळ इतरांवर यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात, हे सरकारला आतातरी कळणार आहे की नाही? अजून खूप जगावसं वाटत होतं. पण वेळेवर पगार नाही, जगावं कसं हेच कळत नाही. मला माफ करा मी माझी मुलं अर्ध्यात सोडून जात आहे.'

'थोडं संघर्ष करुन जगायजं होतं, पण मन आतून पूर्णपणे तुटलेलं आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला जगू देणार नाही. हेच का अच्छे दिन. नाय तिथे खर्च आणि आमचे पगार वेळेवर द्यायला पैसे नाही. अनुराज सॉरी बाळा. मिस यू.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com