Uttar Pradesh Crime: आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; ८ वर्षांच्या मुलासोबत घडली भयानक घटना

Uttar Pradesh Extra Marital Affairs: बादलपूर परिसरात एका ८ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.
uttar pradesh women and her lover killed 8 year old boy shocking incident in sambhal village
uttar pradesh women and her lover killed 8 year old boy shocking incident in sambhal village Saam TV
Published On

Uttar Pradesh Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे प्रेम, अनैतिक संबंधाला विरोध यातून घडत आहेत. पण गुन्हा कितीही मोठा मोठा असला, तरी तो लपून राहत नाही.

याचाच प्रत्यय उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) एका घटनेतून आला आहे. ५ जुलै रोजी नोएडाच्या बादलपूर परिसरात एका ८ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

uttar pradesh women and her lover killed 8 year old boy shocking incident in sambhal village
Beed News : ...अन् नारायणच्या जीवनात आली 'मुस्कान', बीडमधील तरुणाचा तृतीयपंथीशी विवाह

नेमकं काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, बादलपूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने आपला ८ वर्षीय मुलगा अंकित हा २ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता, ५ जुलै रोजी त्याचा मृतदेह जुनवई परिसरात आढळून आला. एवढ्या लहान मुलाची हत्या कोण करू शकतं? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, आईनेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं.

महिलेने मुलाची हत्या का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मुलगा अंकित याने आपल्या आईला शेजारीच राहणारा ओमपाल नामक तरुणासोबत नको त्या अवस्थेत (Crime News) बघितलं होतं. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने आपल्या मुलाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचा प्रियकर ओमपाल, मानक आणि अमर सिंह अशा एकूण ४ जणांना अटक केली आहे.

uttar pradesh women and her lover killed 8 year old boy shocking incident in sambhal village
High Court News : आई व्हायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार 'त्या' महिलेचा, हायकोर्टाचं स्पष्ट मत

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या आईचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पती कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यावर महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. पण एकेदिवशी मुलगा शाळेतून लवकर घरी आला त्याने आपल्या आईला शेजारच्यासोबत नको त्या अवस्थेत बघितलं.

दरम्यान, बदनामीच्या भीतीने आईने प्रियकर ओमपालच्या सांगण्यावरून मुलगा अंकितची हत्या केली होती. ज्यामध्ये महिलेच्या दीर मानक याने देखील तिला मदत केली. हत्येनंतर तिघांनी मिळून अंकितचा मृतदेह दूर जंगलात फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांचा अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आईनेच मुलाची हत्या केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com