Beed News : ...अन् नारायणच्या जीवनात आली 'मुस्कान', बीडमधील तरुणाचा तृतीयपंथीशी विवाह

Transgender Marriage In Beed District : तृतीयपंथीयांबाबत समाजात विविध मतप्रवाह असतांना बीडमधील एका तरुणाने तृतीयपंथीयाशी विवाह केलाय.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

Transgender Marriage : प्रेमाला कोणतीच सीमा नसते असं म्हणतात ते खरेच. प्रेम करताना अनेक तरुण तरुणी सध्या आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना अधिक विचार करतात. कामाच्या ठिकाणी प्रेम करणारे कपल्सही आपल्याला पाहायला मिळतात अशीच एक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील तृतीयपंथीयांबाबत समाजात विविध मतप्रवाह असताना बीडमधील एका तरुणाने तृतीयपंथीयाशी विवाह केलाय. मुळ घनसावंगी तालुक्यातील असलेल्या या तरुणाने बीड येथील मुस्कान शेख अलीया बक्ष या तृतीयपंथीयाशी येरमाळा येथे विवाह केलाय. आता बीडमध्येच राहुन संसार थाटणार असल्याचे या तरुणाने सांगितले.

Beed News
Why Women Choose Younger Men To Love : महिलांच्या आवडीनिवडीबाबत नवं संशोधन, आश्चर्यचकित करणारी निरीक्षणे

घनसावंगी येथील नारायण हा तरुण बीड नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या जातेगाव येथे मिनी बँकेत कार्यरत आहे. या दरम्यान त्याची ओळख बीड येथील तृतीयपंथी मुस्कान शेख अलीया बक्ष यांच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात (Love) झाल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नारायण व मुस्कान यांचा विवाह सोहळा येरमाळा येथे काही मित्र व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. आता हे दोघेही बीड येथेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर गेल्या वर्षभरापूर्वी बीड येथील तृतीयपंथी सपना आणि बाळू यांचा विवाह (Marriage) सोहळा पार पडला होता. ते दोघेही बीडमध्येच राहतात. आता त्यांच्या पाठोपाठ नारायण आणि मुस्कान यांचा विवाह सोहळा पार पडला.

Beed News
Yoga For Diabetes : मधुमेहींनो, सकाळी उठल्यानंतर ही योगासने करा; ब्लडशुगर राहिल नियंत्रणात

बीड जिल्ह्यातील हा दुसरा विवाह सोहळा अगदी पारंपारिकरित्या पार पडला आहे. या विवाहाकरिता बीड येथील आश्रय सेवा केंद्र या तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील तृतीय पंथीयांकरिता विविध उपक्रम राबविले जातात. आता मुस्कान व नारायण यांच्या भावी वाटचालीसाठी शासनाकडून काही मदत मिळते का ? याबाबत पाठपुरावा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com