सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Uttar Pradesh Three Consecutive Holidays In October 2026: उत्तर प्रदेशमध्ये सलग तीन दिवस सुट्टी जाहीर झाल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनुसार शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांच्या सुट्ट्यांबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
UTTAR PRADESH THREE-DAY HOLIDAY NEWS
UTTAR PRADESH THREE-DAY HOLIDAY NEWSsaam tv
Published On: 

उत्तरप्रदेशमध्ये सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. 18 ऑक्टोबरला रविवार आणि 20 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त सरकारी कार्यालये तसेच शाळा महाविद्यालये बंद राहणार आहेत. त्यातच रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 19 ऑक्टोबरलाही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचारी आणि शाळा-महाविद्यालायातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता थेट 21 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारपासून सरकारी कार्यालय सुरू होतील. मुख्यमंत्री योगी यांच्या घोषणेनंतर मुख्य सचिवांनी सुट्टीसंदर्भातील आदेश सर्व जिल्ह्यांना जारी केला आहे.

UTTAR PRADESH THREE-DAY HOLIDAY NEWS
Sanjay Raut On Modi | इंदापुरातील मेळाव्यातून राऊतांचा भाजप- मोदींवर हल्लाबोल! | Marathi News

शिक्षक आणि कर्मचारी संघटनांनी रामनवमीनिमित्त 19 ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी मान्य केली. उत्तर प्रदेशमध्ये १९ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यासाठी विशिष्ट बीटीसी शिक्षक वेल्फेअर असोसिएशनसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्य सचिवांना पत्र पाठवले होते. या पत्रात संघटनांनी म्हटले होते की, १८ ऑक्टोबरला रविवार आणि २० ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी आहे. त्यामुळे १९ ऑक्टोबरलाही सुट्टी जाहीर केल्यास सलग तीन दिवसांची सुट्टी मिळू शकते. संघटनांची ही मागणी मुख्यमंत्री योगी यांनी मान्य केली आहे.

UTTAR PRADESH THREE-DAY HOLIDAY NEWS
Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

उत्तरप्रदेशमध्ये सण उत्सवाची रणधुमाळी सुरू आहे. नवरात्री-दसरा ते छट पूजेपर्यंत सलग तीन दिवस सरकारी कार्यालये, कॉलेजला सुट्टी असणार आहे. १८ ऑक्टोबरला रविवार असल्याने सुट्टी असेल. १९ ऑक्टोबरला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर २० ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त सुट्टी असेल. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com