
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये आज शनिवारी शारदा नदीत बोट उलटल्याची घटना घडली. बोट उलटून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांना सुरक्षित वाचवण्यात आलं आहे. अंत्यविधीला जाताना दुर्दैवी घटना घडल्याची माहिती हाती आली आहे.
शारदा नदीतून बोटीने मृतदेह अंत्यविधीला घेऊन जाताना दुर्देवी घटना घडली. या घटनेत सात लोकांना वाचण्यात यश आलं. मात्र, दुर्देवी घटनेत ५ जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. बोट बुडाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तंबौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनगंज परिसरात आज शनिवारी सकाळी ११ वाजता घटना घडली. दिनेश गुप्ता नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह बोटीने अंत्यविधीसाठी नेण्यात येत होता. त्याचवेळी शारदा नदीत बोट उलटून दुर्दैवी घटना घडली. १२ हून अधिक प्रवाशांची बोट उलटली. बोट नदीत उलटल्यानतंर प्रवासी पाण्यावर तरंगू लागले. बघता बघता स्थिती भीषण झाली.
स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कुमकुम (१३), नीरजची पत्नी खुशबू, जगदीश यांचा मुलगा संजय यांचा मृत्यू झाला. तर ७ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. यातील १३ वर्षीय किशोरीची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटना घडल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून घटनास्थळाचा आढावा घेण्यात येत आहे. बोटमध्ये प्रवासी अधिक असल्याने अपघात घडल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनाने मृतकांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. तिघांच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.