UP Road Accident : उत्तर प्रदेशच्या वाराणसीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत रस्ते अपघात पती-पत्नीसहित ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांचा १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, रस्त्यावर भरधाव कार डंपरला धडकली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघाताची मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारचता दरवाजा कापून मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवले. हा भीषण अपघात मिर्जामुराद ठाणे हद्दीतील बिहडा गावाजवळ झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडुआडीच्या बजरंग कॉलनीनगर कॉलनीत राहणाऱ्या दीपक पांडेय येथून कारने घरी परतत होते. गुरुवारी सकाळी पाच वाजता नॅशनल हायवे-१९ जवळ त्यांची कार डंपरला धडकली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याची कार वेगात होती. ही भरधाव कार रस्त्यावर डंपरला धडकली. या घटनेत दीपक कुमार पांडेय (३५), उर्मिला पांडेय (३२), दीपक यांची सासू केसरी देवी (५५) अर्पिता गुप्ता यांचा मृत्यू झाला. तर दीपक यांचा मुलगा शिवांश पांडेय याची प्रकृती चिंताजनक आएहे. त्याच्यावर बीएसयू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, 'आज सकाळी पाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. त्यानंतर या तिघांना बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवलं. तिघांचा आधीच मृत्यू झाला होता. तर एका महिलेने उपचारादरम्यान जीव सोडला. सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टमनंतर शवगृहात ठेवण्यात आले आहेत.
बुलढाण्यात उभ्या एसटी बसला मोटार सायकल धडकली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलढाण्यातील चिखली ते मेहकर रोडवरील वरदडा फाट्यावर ही घटना घडली. वरदडा फाट्यावर एसटी बस बंद अवस्थेत उभी होती. या बसला भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. दुचाकीस्वाराने बसला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. गोपाल सुरडकर, धनंजय ठेंग, सुनील सोनुने अशी मृतकांची नावे आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.