Gangappa Pujari
असामान्य कर्तृत्व, जिद्द आणि प्रामणिक कष्टाच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवलेले, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी आज जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
रतन टाटांनी प्रत्येक भारतीयांचा विचार करत आपल्या उद्योग क्षेत्रात अनेक बदल केले. प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विचार करुन उत्पादनांची निर्मिती करण्यावर टाटांनी भर दिला.
याचेच उदाहरण म्हणजे टाटा नॅनो. सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न टाटांच्या या प्रयोगामुळे पूर्ण झाले.
रतन टाटा यांना नॅनो कारची कल्पना कशी सुचली माहितेय का? टाटांनी नॅनो कार आणण्यामागची स्टोरी वाचून तुम्हीही त्यांच्या दुरदृष्टीचे कौतुक कराल.
एका सामान्य कुटुंबाला दुचाकीवर प्रवास करताना पाहून रतन टाटा यांना नॅनो कार बाजारात आणण्याची कल्पना सुचली.
नोव्हेंबर 2003 मध्ये रतन टाटा प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी स्कुटरवर एक कुटुंब जाताना पाहिले. पती- पत्नी आणि मुले असे हे कुटुंब दाटीवाटीने दुचाकीवर प्रवास करत होते, धो- धो पाऊसही कोसळत होता. हे चित्र पाहून रतन टाटांना सर्वांना परवडेल अशी चारचाकी गाडी बाजारात आणण्याची कल्पना सुचली.
त्यानंतर पुढील पाच वर्षांनी टाटा कंपनीने नॅनो कार बाजारात आणली अन् अनेकांचे चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण झाले.
NEXT: साडीत सजली सुंदरा; मराठी अभिनेत्रीचा सोज्वळ साज!