Buldhana Tourism : खळखळून वाहणाऱ्या नद्या अन् सुंदर मंदिरांनी बहरलेला बुलढाणा

Tourist Places in Buldhana : एक दिवसाच्या ट्रिपसाठी बुलढाण्यातील या सुंदर पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या.
Tourist Places in Buldhana
Buldhana TourismSaam TV
Published On

दसरा सण येत्या २ दिवसांवर आला आहे. दसऱ्यानंतर दिवळी येत आहे. यंदा दिवाळीला अगदी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरुवात होणार आहे. सण सुरु झाले की शाळांसह ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी मिळते. आता या सुट्टीत तुम्ही कुठेतरी छोटीशी ट्रिप प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुम्हाला बुलढाणामधील काही खास पर्यटनस्थळांची माहिती सांगणार आहोत.

Tourist Places in Buldhana
Buldhana Politics: राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करणं भोवलं; आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

विदर्भातील एक प्रसिद्ध जिल्हा म्हणजे बुलढाणा. बुलढाण्यात विविध पर्यटन स्थळे आहेत. येथे तुम्ही फॅमिलीसह किंवा मित्रपरिवारासह फिरण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी येऊ शकता.

गजानन महाराज मंदिर

बुलढाण्यातील शेगाव येथे गजानन महाराज मंदिर लागेत. तुम्ही येथे जाण्यासाठी बस किंवा ट्रेनने प्रवास करू शकता. बुलढाण्यातील हे फार मोठे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. बुलढाण्यात तुम्ही प्रायव्हेट वाहनाने जात असाल तर रस्त्यातच तुम्हाला सुरुवातीला शेगाव लागेल आणि तेथे हे मंदिर आहे.

कंचनी महाल

बुलढाण्यात आल्यावर येथे आणखी एक फिरण्यासारखं ठिकाण म्हणजे कंचनी महाल. ही वास्तू मेहकर तालूक्यात आहे. हा महाल पूर्ण दगडांपासून बांधण्यात आला आहे. ही वास्तू खरोखर मनाला शांती देणारी आहे.

अंबाबरवा अभयारण्य

अंबाबरवा अभयारण्य बुलढाण्यातील संग्रामपूर तालूक्यात आहे. सातपुडा पर्वतरांगांवर हे अभयारण्य वसलं आहे. साधारण १२७ चौरस किलोमिटर परिसरात अभयारण्य पसरलं आहे. येथे विविध प्राणी आणि पक्षी राहतात.

राजूर घाट

राजूर घाट बुलढाणा आणि मलकापूर या रस्त्यावर आहे. हा घाट अत्यंत नयनरम्य आहे. घाटात विविध मंदिरे लागतात. शिवाय येथे आजूबाजूला दाट झाडी, खोल दरी आणि नदी आहे. त्यामुळे हा परिसर आणखीनच सुंदर दिसतो.

ज्ञानगंगा अभयारण्य

बुलढाण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक ज्ञानगंगा अभयारण्य आहे. हे अभयारण्य खामगाव, मौतणे आणि चिखली या तिन तालुक्यांमध्ये पसरलं आहे. या अभयारण्यातून ज्ञानगंगा नावाची नदी वाहते. त्यामुळे याला ज्ञानगंगा अभयारण्य हे नाव देण्यात आलं आहे.

Tourist Places in Buldhana
Buldhana News : शिक्षकांची तातडीने नेमणुक करा अन्यथा विद्यार्थ्यांसह मंत्रालय गाठू;प्रशांत डिक्करांचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com