Buldhana Politics: राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करणं भोवलं; आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Buldhana Politics: काँग्रेसने 4 तास ठिय्या आंदोलन केल्या नंतर बुलढाणा पोलिसात कलम 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिवसेना आमदार संजय गायकवाड
शिवसेना आमदार संजय गायकवाड SaamTvNews
Published On

संजय जाधव, साम प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणं शिवसेना आमदाराच्या चांगलेच अंगाशी आले आहे. बुलढाण्यातील काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेसने 4 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर बुलढाणा पोलिसात कलम 192 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

'राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ'', असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यवर आक्रमक होत बुलढाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये 4 तासापासून ठिय्या आंदोलन केलं. काँग्रेसचे आमदार राजेश इकडे, धीरज लिंगाडे, प्रभारी कुणाल चौधरी , प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com