इंडिया आघाडीला मोठा धक्का! भाजपनं काँग्रेसच्या मित्रपक्षाचे 3 आमदार फोडले

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. बुधवारी, समाजवादी पक्षाचे तीन बंडखोर आमदार राकेश सिंग, अभय सिंग आणि विनोद चतुर्वेदी अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झालेत. स्मृती इराणी आणि पंकज चौधरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
Three Samajwadi Party rebel MLAs join the BJP in Uttar Pradesh ahead of the 2027 Assembly elections.
Three Samajwadi Party rebel MLAs join the BJP in Uttar Pradesh ahead of the 2027 Assembly elections.
Published On: 
Summary
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू

  • समाजवादी पक्षाच्या तीन बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • स्मृती इराणी आणि पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

देशभरात भाजपविरोधात इंडिआ आघाडीनं रान पेटवलंय. त्याचदरम्यान भाजपनं काँग्रेसचा मित्रपक्ष समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिलाय. उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी केली जातेय. त्याचपार्श्वभूमीवरसमाजवादी पक्षाच्या ३ बंडखोर आमदारांचा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करून घेतलाय. भाजपमध्ये सामील झालेल्या या आमदारांमध्ये राकेश प्रताप सिंग (गौरीगंज मतदारसंघ, अमेठी), अभय सिंग (गोसाईगंज मतदारसंघ, अयोध्या) आणि विनोद चतुर्वेदी (कल्पी मतदारसंघ, जालौन) यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, मागासवर्गीय मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरपाल मौर्य आणि मंत्री दारा सिंह चौहान यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बुधवारी अमेठीतील गौरीगंज येथे आमदार राकेश प्रताप सिंह यांचे निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

Three Samajwadi Party rebel MLAs join the BJP in Uttar Pradesh ahead of the 2027 Assembly elections.
नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना गौरीगंजचे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह म्हणाले की, "मी माझ्या मतदारसंघातील त्या जनतेचे आभार मानतो. ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि मला भाजपमध्ये सामील होण्याचा आग्रह केला." ते माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपापल्या बूथवर विजय मिळवला होता किंवा पराभव स्वीकारला होता, त्यापैकी ९८टक्के लोक समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होतील, असा दावाही आमदार राकेश प्रताप सिंह यांनी केलाय.

Three Samajwadi Party rebel MLAs join the BJP in Uttar Pradesh ahead of the 2027 Assembly elections.
ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

आमदार राकेश सिंग यांनी पुढे सांगितले की, आमदार विनोद चतुर्वेदी, अभय सिंग आणि ते स्वतः भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींसह सुमारे १,००० लोक भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी मंचावर साधारणपणे डझनभर आमदार उपस्थित असतील. आमदारांच्या या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी हजारो समर्थक घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com