MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

MLA Umashankar Singh Passes Away: बसपाच्या एकमेव आमदाराचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ
MLA Umashankar Singh Passes AwaySaam Tv
Published On
  • बसपचे आमदार उमाशंकर सिंह यांचे निधन

  • ३ वेळा ते आमदार राहिले होते

  • कर्करोगाने त्यांचे निधन झाले

  • उत्तर प्रदेशच्या राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे

उत्तर प्रदेशच्या राजकारणातून दु:खद बातमी समोर आली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे एकमेव आमदाराचे निधन झाले. बलियाच्या रसरा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे तीन वेळा निवडून आलेले आमदार उमाशंकर सिंह यांचे निधन झाले आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार उमाशंकर सिंह गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी उमाशंकर सिंह यांच्या निधनाला कधीही भरून न येणारे नुकसान म्हटलं आहे. आमदार उमाशंकर सिंह हे बलियाच्या नागरा ब्लॉकमधील खानवार गावचे रहिवासी होते. ते रसरा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. एकमेव आमदाराचे निधन झाल्यामुळे हा बसपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

बसपाचे आमदार उमाशंकर सिंह यांचा जन्म २ जानेवारी १९७१ रोजी बलिया जिल्ह्यातील खानवार गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बलिया येथे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना राजकारणात रस होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थीदशेतच झाली. २००० साली त्यांनी जिल्हा पंचायत सदस्यपदाची निवडणूक जिंकली आणि ते जिल्हा पंचायत अध्यक्षही बनले.

MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ
Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

त्यानंतर उमाशंकर सिंह यांनी २०१२ मध्ये बसपाच्या तिकिटावर पहिल्यांदा रसरा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी २०१७ आणि २०२२ मध्ये देखील ते आमदार म्हणून निवडून आले होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला मोठा धक्का बसला होता. उमाशंकर सिंह हे बसपाचे फक्त एकमेव आमदार या निवडणुकीत विजयी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com