मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

UP Politics : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी करत आहे. दुहेरी पद भूषवणाऱ्या नेत्यांना हटवणे, नवीन टीमचा समावेश, जातीय समीकरणे आखली जात आहेत.
UP Politics :
BJP preparing major reshuffle before UP Assembly Elections 2027saam tv
Published On
Summary
  • भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची शक्यता.

  • 2027 विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची तयारी सुरू.

  • दुहेरी पद भूषवणाऱ्या काही नेत्यांची उचलबांगडी होऊ शकते.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. भाजपनं २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठी उलटफेर करण्याच्या विचारात आहे. विधान सभेच्या निवडणुका अजून वेळ जरी असला तरी भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यासाठी जवळपास युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत चर्चा आणि अलीकडील संघटनात्मक हालचालींवरून उत्तर प्रदेश भाजपमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.

UP Politics :
भाजप सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाकोणाला मिळणार डच्चू?

पक्षातील नेत्यांच्या पदाचं का होणार फेरबदल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा राजकीय धक्का बसला. ८० जागांच्या या राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अपेक्षेपेक्षा कमकुवत कामगिरी केली, तर समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने शानदार कागिरी केली होती. यानंतर भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले की, केवळ सरकारच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत; संघटनाही मजबूत केली पाहिजे.

त्यानंतरच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने पुनरागमन केलं पण २०२७ ची निवडणूक भाजपसाठी अधिक कठीण ठरण्याची शक्यता आहे, असा पक्ष नेतृत्वाचा विश्वास आहे. याच कारणास्तव, बूथ स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत संघटनेचा आढावा घेतला जातोय.

दुहेरी पदे भूषवणारे नेते रडारवर

भाजपच्या संघटनात्मक संस्कृतीने नेहमीच 'एक व्यक्ती, एक जबाबदारी' या तत्त्वाचे पालन केलंय. मात्र,कालांतराने असे अनेक नेते पुढे आलेत, जे संघटना आणि सरकार या दोन्हीमध्ये प्रभावशाली पदांवर आहेत. सूत्रांनुसार भाजपमध्ये आता अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली जातेय.

निवडणुकीच्या तयारीदरम्यान संघटनेला पूर्ण वेळ देऊ शकणाऱ्या नेत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे काही नेत्यांना संघटनेतून आणि इतरांना सरकारमधून हटवून नवीन जबाबदाऱ्या देण्यात .येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

UP Politics :
Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

पक्षातील नेत्याची का केली जाणार उचलबांगडी

आता हाती आलेल्या अहवालांनुसार, भाजप राज्यातील संघटनेत ५० टक्क्यांपर्यंत बदल करण्याची शक्यता आहे. प्रादेशिक अध्यक्ष, आघाडीचे अध्यक्ष आणि अनेक प्रमुख अधिकाऱ्यांची जागा बदलली जाऊ शकते. हे आता जिल्हा स्तरावरही दिसू लागले आहे. नियमितपणे नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपला २०२७ पूर्वी संघटनेत सत्ताविरोधी लाट निर्माण होऊ द्यायची नाहीये. दीर्घकाळ कार्यरत असलेल्या नेत्यांना हटवणे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणे हा याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com