

Uttar Pradesh Accident News: उत्तरप्रदेशमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मन सुन्न करणाऱ्या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Accident News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लग्नाच्या दिवशीच रस्त्यावर झालेल्या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाल्याने दोन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. प्रयागराजच्या घूरपूर परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कमलेश हा बोगा बसवर गावातील रहिवासी जोखू निषाद यांचा सर्वात लहान मुलगा होता. तो तामिळनाडूतील एका कंपनीत कामाला होता. आई-वडिलांनी त्याचा लग्न सोहळा निश्चित केला होता. 11 जून रोजी हे लग्न होणार होते.
लग्नसोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. फक्त नवरदेव तयार व्हायचे बाकी होते. त्यासाठी कमलेश त्याच्या पुतण्यासोबत पार्लरसाठी गेला. यावेळी रस्ता ओलांडत असताना त्याचा पाय दुभाजकावर आदळल्याने तो खाली पडला. इतक्यात मागून येणाऱ्या भरधाव बसने त्याला चिरडले. लोकांनी लगेच त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Accident News)
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमलेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसरीकडे कमलेशच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळताच दोन्ही कुटूंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ज्या घरात लग्नाची वरात येणार त्याच घरात नवरदेवाची अंतयात्रा निघाल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.