गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड
Pimpari-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpari chinchwad) एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Police Constable Ended Life) केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोलिसाने आत्महत्या का केली यामागचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणाचा तपास पिंपरी पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल माने असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशाल माने हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ड्युटीवर होते. ते एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबलने या पदावर कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड येथील यशवंत नगरमध्ये ते राहायला होते. राहत्या घरीच गुरुवारी रात्री त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
विशाल माने साप्ताहिक सुट्टीवर होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. त्यांनी गळफास लावून घेतला. विशाल माने यांनी आत्महत्या का केली? हे अजूनतरी स्पष्ट झाले नाही. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पिंपरी पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचारीने आत्महत्या केली होती. श्रीनगर पोलीस ठाण्यात त्या महिला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पोलीस ठाण्यातील महिला कक्षामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राज्यामध्ये पोलीस आत्महत्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.