15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Government Transfers 15 IAS Officers: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत १५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शशि प्रकाश गोयल, अनुराग श्रीवास्तव, आलोक कुमार यांच्यासह कोणत्या अधिकाऱ्याला कोणती नवी जबाबदारी मिळाली? वाचा संपूर्ण यादी.
UTTAR PRADESH IAS TRANSFERS 2026
UTTAR PRADESH IAS TRANSFERS 2026saam tv
Published On: 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहे. राज्यातील 15 IAS अधिकाऱ्यांच्या विभागांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या फेरबदलात मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव शशि प्रकाश गोयल यांच्याकडे नागरी विमान वाहतूक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, तर अपर मुख्य सचिव अनुराग श्रीवास्तव यांची कृषि उत्पादन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी आलोक कुमार यांच्याकडे पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

UTTAR PRADESH IAS TRANSFERS 2026
संमतीने ठेवलेले शरीरसंबंध ब्रेकअपनंतर बलात्कार ठरवता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

पत्रकात प्रसिद्ध केलेल्या महितीनुसार, शशि प्रकाश गोयल यांच्याकडे सध्याच्या जबाबदाऱ्यांसह नागरी विमान वाहतूक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अपर मुख्य सचिव अनुराग श्रीवास्तव यांची कृषी उत्पादन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे नमामि गंगे आणि ग्रामीण जलपुरवठा, लघुसिंचन व भूजल विभाग, ग्रामीण पेयजल मिशन तसेच राज्य स्वच्छ गंगा मिशनच्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे. अपर मुख्य सचिव आलोक कुमार यांच्याकडे पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभाग, अनिवासी भारतीय (NRI) विभाग आणि पीसीपीएचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

UTTAR PRADESH IAS TRANSFERS 2026
नराधमांनी गाठली क्रौर्याची परिसीमा; १६ वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, संतापाची लाट

या प्रशासकीय फेरबदलात एम. देवराज यांच्याकडे राज्य दक्षता आयोग आणि शासनाधिकरण-१ चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉ. एम.के.एस. सुंदरम यांच्याकडे समन्वय आणि यूपीडाच्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर आलोक कुमार-३ यांच्याकडे वित्त, संस्थात्मक वित्त आणि बाह्य सहाय्यित प्रकल्पांशी संबंधित अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. अजय चौहान यांच्याकडे यूपीसीडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर पंधारी यादव यांना बाह्य सहाय्यित प्रकल्पाच्या प्रमुख सचिवपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. योगेश कुमार यांची पीसीडीएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित कुमार सिंह यांच्याकडे उत्तर प्रदेश जल निगम (ग्रामीण) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

UTTAR PRADESH IAS TRANSFERS 2026
आणखी एका राज्यात धावणार बुलेट ट्रेन! फक्त 3.5 तासांत पोहोचणार; विमान प्रवासापेक्षाही स्वस्त असणार तिकीट

तसेच कृष्ण कुमार यांची झाशी विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांच्याकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि ग्रेटर शारदा सहाय्यक कमांड क्षेत्र विकास प्राधिकरणाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. भूपेंद्र एस. चौधरी यांची उत्तर प्रदेश मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर देवेंद्र सिंह कुशवाहा यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा विभागातील विशेष सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रवीण मिश्रा यांची उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजात बदल होणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.