आणखी एका राज्यात धावणार बुलेट ट्रेन! फक्त 3.5 तासांत पोहोचणार; विमान प्रवासापेक्षाही स्वस्त असणार तिकीट

Delhi To Varanasi Bullet Train Travel Time 3.5 Hours: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या बुलेट ट्रेनमुळे दिल्ली ते वाराणसी प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hours
Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hourssaam tv
Published On: 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या वेगाने सुरू असून लवकरच महाराष्ट्र आणि गुजरातमधील अंतर यामुळे कमी होणार आहे. एकीकडे वंदे भारत, नमो भारतचे जाळं विस्थापित होत असताना आता बुलेट ट्रेनच्या दिशेने देखील मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. PM मोदी यांनी बुलेट ट्रेनच्या उत्तर कॉरीडोरला मंजूरी दिली आहे. यामुळे उत्तरप्रदेश या राज्याला देखील पहिली बुलेट मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hours
Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

ही बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर दिल्ली ते बनारस हा प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण करता येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रवासासाठी लागणारा वेळ भविष्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान वाराणसीमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या नव्या सिग्नेचर ब्रिजबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बांधकामस्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी या पुलाचे नाव 'नमो ब्रिज' अशी घोषणाच करून टाकली. या पुलामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक अधिक सक्षम होण्यासोबतच काशीच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hours
Election: विधानसभेसाठी आपची ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?

2029 पर्यंत पूर्ण होणार 2.5 किलोमीटर लांबीचा नमो ब्रिज

गंगा नदीवर उभारण्यात येणारा नमो ब्रिज सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 2 हजार 657 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा डबल डेकर हायब्रीड ब्रिज असणार आहे. पुलाच्या वरच्या भागात सहा पदरी रस्ता, तर खालच्या भागात चार रेल्वे मार्गिका असतील. या पुलामुळे काशी रेल्वे स्थानकावर आणखी लवकर पोहोचता येईल. तसेच काशी विश्वनाथ मंदिर आणि नमो घाट यांसारख्या प्रमुख ठिकाणी पोहोचनेही अधिक सोयीचे होणार आहे.

Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hours
Israel Elections: इस्रायलमध्ये राजकारण तापलं, निवडणुकीत पैसे वाटून मतं मिळवली; 'मोसाद' चौकशी करणार

100 हून अधिक अतिरिक्त रेल्वे गाड्यांना फायदा

नमो ब्रिजमुळे वाराणसीसह बिहार आणि पूर्वांचलमधील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होण्याचे अपेक्षा आहे. या पुलामुळे 100 हून अधिक अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवाशांना अधिक रेल्वे गाड्या उपलब्ध होतील. हा पुल तीन दिशांनी वाराणसीला जोडणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.

Delhi to Varanasi bullet train travel time 3.5 hours
Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

बुलेट ट्रेनचे तिकीट विमान प्रवासापेक्षा स्वस्त?

दरम्यान, बुलेट ट्रेनच्या तिकिटाच्या दराबाबतही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. काही लोक बुलेट ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असल्याचे सांगून संभ्रम निर्माण करतील, असे ते म्हणाले. मात्र, सरकारच्या विकास योजनांचा उद्देश शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे तिकीट विमान प्रवासाच्या तिकिटापेक्षा कमी ठेवण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. त्यामुळे बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर दिल्ली ते वाराणसी प्रवासाचा वेळ आणि खर्च याबाबत काय चित्र असणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.