Uttar Pradesh Crime: संतापजनक! मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर सामुहिक अत्याचार; घटनेनंतर पती- पत्नीने संपवलं आयुष्य

Uttar Pradesh News: या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अत्याचार केलेल्या दोघा नराधमांना अटक करण्यात आली आहे.
Uttar PradeshCrime News
Uttar PradeshCrime NewsSaam tv
Published On

Uttar Pradesh Crime:

उत्तरप्रदेश मधून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात विवाहितेवर घरात घुसून दोघा नराधमांनी अत्याचार केला. घटनेनंतर पिडित महिला आणि तिच्या पतीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दोघा नराधमांना अटक करण्यात आली आहे.

Uttar PradeshCrime News
Devendra Fadnavis: नागपूरमधील नुकसान टाळता आलं असतं; पूरस्थितीतून धडा घेत देवेंद्र फडणवीसांनी सुचवले 'हे' बदल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात पती- पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. गुरूवार (२१, सप्टेंबर) रोजी मध्यरात्री दोघांनी विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या अत्याचारानंतर दोघांनीही विष प्राशन केले. याबाबतची माहिती मिळताच दोघांना तात्काळ गोरखपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पती- पत्नी दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. आत्महत्या करण्याआधी दोघांनी एक व्हिडिओ शूट केला ज्यामध्ये दोन्ही आरोपींची नावेही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अत्याचार केलेल्या दोघा नराधमांना अटक करण्यात आली आहे. आदर्श (२५) आणि त्रिलोकी (४५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जमिनीच्या वादातून हा अत्याचार करण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

Uttar PradeshCrime News
Gondia News: नागपुर - रायपुर महामार्ग अखेर मोकळा; १८ तासापासून वाहतुक होती ठप्प, वाहन चालकांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com