Husband Killed Wife Crime News
Husband Killed Wife Crime News Saam TV

Crime News : आधी शरीरसंबंध ठेवले, नंतर चिरला बायकोचा गळा; तरुणाच्या कृत्याने अख्खं शहर हादरलं

Husband Killed Wife Crime News : नवऱ्याने आधी बायकोसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Published on

पती-पत्नीचं नातं फक्त आणि फक्त विश्वासावरच टिकून राहतं. जेव्हा या नात्यात संशयाची सुई निर्माण होते, तेव्हा गुन्हेगारीची सुरुवात होते. नवरा-बायकोमधील वादाच्या अनेक घटना तुम्ही आजवर वाचल्या असतील. पण उत्तर प्रदेशात अशी एक घटना घडली, जी ऐकून अख्खं शहर हादरून गेलं. एका तरुणाने भल्यापहाटे पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर बेडवरच तिची गळा चिरुन हत्या केली.

Husband Killed Wife Crime News
Nagpur : तिघांचे हातपाय बांधले होते, मग स्वत: गळफास घेतला, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले

हत्येनंतर त्याने घरातून पळ काढला. सकाळी उठल्यावर समोर आईचा मृतदेह दिसल्यानंतर मुलांनी आरडाओरड केली. स्थानिक जमा झाल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

गुड्डन (वय 35) असं मृत महिलेचं नाव असून संजय असं आरोपी पतीचे नाव आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.

यामुळे दोघांमध्ये सातत्याने वादाचे खटके उडत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपीने पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले. यानंतर तिचा गळा चिरून खून केला. बायकोचा जीव वाचू नये यासाठी त्याने तिच्या शरीरावरही 7 ते 8 वेळा वार केले. त्यानंतर मृतदेह रजाईत गुंडाळला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपीने पत्नीशी शरीर संबंध ठेवल्यानंतर तिची हत्या केली. त्यानंतर प्रथम तिचा गळा धारदार शस्त्राने चिरला. त्यानंतर गळ्यवर तीनदा आणि खांद्यावर दोनदा चाकूने वार केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने महिलेच्या छातीतही चाकू खुपसला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली असून आरोपीच्या शोधात पथके रवाना केली आहे.

Husband Killed Wife Crime News
Crime : धक्कादायक! एकाला अॅसिड टाकून जाळलं, दुसऱ्याला कोयत्याने भोकसलं, संभाजीनगर हादरलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com