Crime News : जावयाला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; सासऱ्याने केलं भयावह कृत्य

जावयाला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत बघितल्याने सासऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जवळच्या असलेल्या लाकडी दांडक्याने सासऱ्याने जावयाच्या नाजूक जागेवर प्रहार केला.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam TV
Published On

मौजंग : जावयाला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत बघितल्याने सासऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जवळच्या असलेल्या लाकडी दांडक्याने सासऱ्याने जावयाच्या नाजूक जागेवर प्रहार केला. यात जावयाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सासऱ्याने आपल्या मुलांच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना उत्तरप्रदेशातील मौगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

Uttar Pradesh Crime News
Viral News : लग्नाच्या वरातीत नवरदेवाचं लज्जास्पद कृत्य; नवरीने थेट हाकलून दिलं, नेमकं काय घडलं?

काय आहे प्रकरण?

उत्तरप्रदेशातील मौगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दामोदरगड डोंगर परिसरात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून (Crime News) आला होता. या व्यक्तीचा हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत मृत व्यक्तीच्या सासऱ्यासह पाच जणांना अटक केली. आरोपींनी खूनाच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

राम सुहवान (वय २७ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामची पत्नी गरोदरपणात आपल्या माहेरी गेली होती. यावेळी जेवणाची व्यवस्था होत नसल्याने रामही सासऱ्याकडे राहायला आला होता. यादरम्यान, रामचे आपल्या मेहुणीसोबत सूत जुळले. दोघेही प्रेमात इतके बुडाले की त्यांना कुठलेही भान राहिले नाही.

एकेदिवशी राम हा आपल्या मेहुणीला घेऊन शेतात गेला. कुणी नसल्याची संधी साधत दोघांनीही शारिरीक संबंध ठेवले. मात्र, अचानक रामचा सासरा हा शेतात आला त्याने रामला आपल्या मुलीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं. जावयाचं कृत् बघून सासऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने शेजारीच पडलेल्या लाकडी दांडक्याने रामच्या नाजूक जागेवर एकापाठोपाठ एक वार केले.

Uttar Pradesh Crime News
Crime News : नवऱ्याला सोडून बायको प्रियकरासोबत फरार; पुढे जे घडलं ते भयंकर होतं...

या घटनेत रामचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सासऱ्याने आपल्या मुलांना शेतात बोलावून घेतलं आणि रामचा मृतदेह दूर जंगलात फेकून दिला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलीला सुद्धा मारहाण केली. याबाबतची वाच्यता कुणाकडे केल्यास तुझाही जीव घेऊ, अशी धमकी रामच्या सासऱ्याने आपल्या मुलीला दिली.

दरम्यान, आठवडाभरानंतर शेळी चारणाऱ्या एका व्यक्तीला जंगलात रामचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याने या घटनेचा माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रामची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, रामचे आपल्या मेहुणीशी अनैतिक संबध होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीनंतर, पोलिसांनी रामच्या मेहुणीची कसून चौकशी केली असता, आपल्याला रामसोबत नको त्या अवस्थेत बघितल्याने वडिलांनी रामची हत्या केल्याची माहिती रामच्या मेहुणीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्यासह पाच जणांना अटक केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com