Crime News : नवऱ्याला सोडून बायको प्रियकरासोबत फरार; पुढे जे घडलं ते भयंकर होतं...

एका विवाहित महिलेने प्रेमासाठी आपल्या पतीला सोडलं आणि आपल्या प्रियकरासोबत राहायला गेली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते हादरवून टाकणारं होतं.
Married Woman Cheating
Married Woman Cheating Saam TV
Published On

Married Woman Cheating : प्रेम कधी कुणावर कसं होईल हे सांगता येत नाही. प्रेमासाठी लोकं वाट्टेल ते करतात. प्रेमात जात पात बघितल्या जात नाही. मात्र, कधी-कधी प्रेमात फसवणूक देखील होते. त्यानंतर अनेकांना मनस्ताप होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. एका विवाहित महिलेने प्रेमासाठी आपल्या पतीला सोडलं आणि आपल्या प्रियकरासोबत राहायला गेली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते हादरवून टाकणारं होतं. (Latest Marathi News)

Married Woman Cheating
Viral Video : बॉयफ्रेंडला लग्नात नाचताना पाहून नवरीचा संयम सुटला; पुढे जे घडलं ते कल्पनेच्याही पलीकडे

नेमकं काय घडलं?

ही घटना मध्यप्रदेशातील आहे. येथील एका विवाहित महिलेची सोशल मीडियावर एका तरुणासोबत ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. काही दिवसांनी मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

तरुणाच्या सांगण्यावरून विवाहित महिलेने आपल्या पतीसह दोन मुलांना सोडून दिलं आणि प्रियकरासोबत फरार (Crime News) झाली. मात्र, नंतर तिला पश्चातापशिवाय काहीच मिळालं नाही. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर तो पळून गेला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.

आता पीडित महिलेच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तरुणाशी तिची भेट सोशल मीडियावरून झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.

Married Woman Cheating
Gram Panchayat Election : पत्नीच्या निवडणूक निकालाआधीच पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. पीडितेने या तरुणाला सांगितलं होतं की,ती विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. यावर तरुणाने तिला आपण लग्न करू असं आश्वासन दिलं. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, पती तिला मारहाण करायचा. नवऱ्याच्या वागण्याने तिला खूप त्रास होत होता.

त्यामुळेच तिने सदरील तरुणासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या तरुणाने पीडितेसोबत लग्न न करता फक्त तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिला सोडून तो फरार झाला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com