Bride Cancel The Wedding Viral News : लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. कधी डीजेवर नाचणाऱ्या नवरदेवाच्या मित्रांमुळे लग्नात गोंधळ निर्माण होतो. तर कधी नवरदेवाने केलेल्या हट्टापायी लग्नात विघ्न येतात. असाच काहीसा प्रकार एका नवरदेवासोबत घडला आहे. नवरदेवाने लग्नात असं काही कृत्य केलं की ते पाहून नवरीनं वऱ्हाडीसह नवरदेवाला खाली हात परत पाठवलं आहे. (Maharashtra Political News)
नेमकं काय घडलं?
ही घटना बिहारमधील वैदपूर गावातील आहे. येथील एका तरुणाचं (Viral News) बांका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. अगदी धूमधडाक्यात लग्नाची तयारी सुरू होती. नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी नवरीच्या गावात पोहचले. त्यानंतर डिजेच्या तालावर नवरदेवाची वरात सुद्धा निघाली. नवरदेवाचे मित्र अगदी बेभानपणे नाचत होते.
नवरदेवाला आवरला नाही नाचण्याचा मोह
अशातच नवरदेवालाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्याने आपल्या मित्रांना डिजेच्या तालावर थिरकताना पाहून घोड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आणि नाचायला सुरूवात केली. आपल्याच लग्नात हा नवरदेव इतक्या विचित्र प्रकारे वरातीत नाचायला लागला, की त्याला कुठलंही भान राहिलं नाही.
त्याचवेळी नवरी आणि तिच्या मैत्रिणी एका गच्चीवर उभ्या राहून वरात पाहत होत्या. नवरदेवाला लग्नात विचित्र पद्धतीने नाचताना पाहून नवरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नवरदेवाच्या या कृत्यावर नवरीने नाराजी व्यक्त केली. आणि आल्या पावली नवरदेवाला वऱ्डाही मंडळीसह माघारी फिरण्यास सांगितलं.
...अन् वऱ्हाडी माघारी फिरले
नवऱ्या मुलीच्या या निर्णयामुळे वऱ्हाडी प्रचंड संतापले. यावेळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेकांनी नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नवऱ्या मुलाची मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे त्याच्याशी लग्न करू शकत नाही, असं तिचं म्हणणं होतं. गावातल्या लोकांनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला, तर पंचायतीनंही तिला पाठिंबा दिला. त्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांना लग्न न होताच माघारी जावं लागलं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.