भयंकर! प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध; तरुणीने चक्क आई वडिलांनाच संपवलं

मुन्ना लाल उत्तम (वय 61) आणि राजदेवी (वय 55) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत
Kanpur Crime
Kanpur Crime Saam TV

कानपूर : प्रेमविवाह करण्यास विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई वडिलांची मुलीनेच हत्या केल्याची एक भयंकर उघडकीस आली. मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हे धक्कादायक कृत्य केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. उत्तरप्रदेशातील कानपूर शहरात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. (Kanpur Crime News)

Kanpur Crime
देशात कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या, 28 मृत्यू

मुन्ना लाल उत्तम (वय 61) आणि राजदेवी (वय 55) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. कानपूर शहरात असलेल्या यादव मार्केट सोसायटीमध्ये मंगळवारी दोघांचेही मृतदेह पोलिसांना आढळून आले होते. दोघांचीही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या केली. अशी तक्रार मुन्नालाल यांचा मुलगा अनुप याने पोलिसांत दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी 10 तासांच्या आत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला.

या वृद्ध जोडप्याची हत्या त्यांच्याच मुलगी कोमल हिने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आई वडिलांची हत्या करण्यासाठी कोमल वय (31) हिने तिचा प्रियकर रोहित (वय 28) याची मदत घेतली. पोलिसांनी सांगितले की, कोमल आणि रोहितचे एकमेकांवर प्रेम होते. (Uttar Pradesh Crime News)

Kanpur Crime
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; २ दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण

दोघांनाही लग्न करायचं होतं. मात्र त्यांच्या लग्नाला कोमलच्या आई-वडिलांचा विरोध होता. कोमलच्या आई वडिलांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती सुद्धा होती. रोहित आणि कोमलला लग्न करून ती हडप करायची होती. म्हणूनच दोघांनी मिळून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, आई-वडिलांची हत्या करण्यासाठी कोमलने सोमवारी रात्री दोघांनाही ज्यूसमधून नशेच्या गोळ्या दिल्या. ज्यूस पिल्यानंतर तिचे आई वडिल बेशुद्ध झाले. बेशुद्ध पडल्यावर तिने प्रियकराला बोलावले आणि नंतर आई-वडिलांचा गळा चिरून खून केला. घटनेनंतर प्रियकर निघून गेल्यावर कोमलने आरडाओरडा सुरू केला. (Latest Crime News)

यापूर्वी कोमलने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चौकशीदरम्यान सांगितले होते की, 'पप्पा बाहेर खोलीत झोपले होते. मी मधल्या खोलीत आईसोबत झोपली होती. हा खून केव्हा झाला हे कळू शकलेले नाही. आवाज ऐकून मी डोळे उघडले असता तीन मास्क घातलेले माणसे घरातून पळत असल्याचे दिसले'.

मात्र, ही हत्या जवळच्याच व्यक्तीने केली असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती हातात त्यांना मुन्नालाल यांच्या घरातून बाहेर पडताना दिसून आला. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा तो कोमल हिचा प्रियकर रोहित असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी रोहितला खाक्या दाखवताच कोमलच्या सांगण्यावरून आपण हत्या केल्याची कबूली त्याने दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com