

उत्तर प्रदेशच्या बारांबकीमध्ये घडली धक्कादायक घटना
लग्नानंतर ५ तासांत जोडप्याने नातं मोडलं
वादानंतर नवरीने घेतला घटस्फोटाचा निर्णय
उत्तर प्रदेशच्या बारांबकीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर नवऱ्याने सासरच्या मंडळीकडे बाइकसाठी हट्ट केला. याच बाइकवरून लग्नानंतर ५ तासांत नवरा-नवरीचं कडाक्याचं भांडण झालं. नवरा-नवरीने वादानंतर थेट घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेतला. नवरीच्या निर्णयाने संपूर्ण गावात चर्चांना उधाण आलं.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर गावात दोघांचं विधी आणि परंपरासह लग्न पार पडलं. वादामुळे लग्नानंतर काही तासांतच नवरीने सासरी न जाण्याचा निर्णय घेतला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरच्या नालापार दक्षिणी भागात राहणाऱ्या तरुणीचं लग्न सद्दीपूर भागात राहणाऱ्या तरुणाशी जमलं. दोघांचं शुक्रवारी दुपारी धामधुमीत लग्न झालं. लग्नानंतर काही तासांत दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाले.
लग्न झाल्यानंतर नवऱ्याने दुचाकीची मागणी केल्याचा आरोप आहे. दुचाकीमुळे दोघांमध्ये वाद आणखी वाढला. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये कडाक्याचं भांडणास सुरुवात झाली. काही वऱ्हाडी मंडळींनी शिवीगाळ केल्याचा आरोप नवरीच्या कुटुंबीयांनी केला.
वाद मिटवण्यासाठी नगर पंचायतचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकाने वाद सोडवण्यास बोलवण्यात आलं. त्यांनी दोन्ही पक्षकारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद मिटला. या वादानंतर नवरीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
वादानंतर नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. तिने नवऱ्यासोबत राहणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. यामुळे लग्नानंतर काही तासांत जोडप्याने घटस्फोटाचा प्रक्रिया सुरू केली. लग्नानंतर जवळपास ५ तासांत घटस्फोटाची प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. नवरीच्या निर्णयाने तिच्या नातवाईकांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.