Uttar Pradesh News: माझी बायको डोक्यावर पदर घेऊन लपून लपून गुटखा खाते आणि घरभर थुंकते; नवरा पोलिसांकडे गेला, तक्रार केली

Agra News: उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. आग्रा येथे एका कुटुंबाने सून गुटखा खात असल्याने पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणी कुटुंबियांनी समुपदेशन केंद्राशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली.
Marriage
MarriageSaam tv
Published On

Uttar Pradesh Agra News:

उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. आग्रा येथे एका कुटुंबाने सून गुटखा खात असल्याने पोलिसांत तक्रार केली आहे. या प्रकरणी कुटुंबियांनी समुपदेशन केंद्राशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली.

माझी बायको डोक्यावर पदर घेते आणि लपून लपून गुटखा खाते. काम करताना ती घरात थुंकत सुटते, अशी तक्रार तिच्या नवऱ्याने दिली आहे. सून डोक्यावर पदर घेऊन गुटखा खाते, असं सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे. तिला गुटखा खाऊ नको, असे समजावण्यात आले होते. परंतु ती ऐकत नसल्याची त्यांची तक्रार आहे. माझी बायको घरातील कामे करता करता गुटखा खाते. घरात इकडे तिकडे थुंकते, अशी तिच्या नवऱ्याची तक्रार आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीवर आरोप केले होते. आपल्या पतीचे बाहेर इतर मुलींशी संबंध असल्याचे तिने सांगितले. हा आरोप खोटा असल्याचे पतीने सांगितले. गुटखा खात असल्याने नवऱ्याने पत्नीला सोडले. त्यामुळेच ती हा आरोप करत असल्याचे नवऱ्याने सांगितले.

एका वृत्तानुसार, पती-पत्नीचे नुकतेच लग्न झाले होते. सासरी आल्यापासूनच नवरी पदराखाली लपून गुटखा खायची. कुटुंबियांनी तिचे हे व्यसन सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिने ऐकले नाही. त्यानंतर तिला काउंसिलिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आले.

Marriage
Madhya Pradesh: विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला भीषण आग; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

पतीचे बाहेर इतर मुलींशी संबंध असल्याचा दावा पत्नीने केला. त्याच्या मोबाइलवर अनेक मुलींचे फोन येतात, असंही तिने म्हटलं. अनेकदा तिने त्यांचे फोनवरचे बोलणे ऐकले. तसेच तिने सासरच्या मंडळींवर आणि पतीवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळेच त्यांना मूल होऊ शकत नसल्याचाही आरोप पत्नीने केला आहे. व्यसन सोडावे, म्हणून तिची खूप समजूत काढण्यात आली. अखेर ती काहीही ऐकत नसल्याने काउंसिलिंग सेंटरमध्ये नेण्यात आले.

Marriage
Amethi Lok Sabha: अमेठीत यंदा स्मृती इराणी जिंकणार की राहुल गांधी विजय मिळणार? सर्वेक्षणात समोर आली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com