Madhya Pradesh: विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला भीषण आग; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

Madhya Pradesh Fire News: आगीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहन चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्ताच्या कडेला उभी केली
Madhya Pradesh
Madhya PradeshSaam TV
Published On

Fire News:

मध्य प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी शाळकरी मुलींना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Madhya Pradesh
Malegaon Fire: नाशिकच्या मालेगावात भीषण आग; 25 हून अधिक घरे जळून खाक, गरिबांच्या संसाराची झाली राखरांगोळी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाहन चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्ताच्या कडेला उभी केली आणि सर्व लहान मुलांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. सध्या सर्व मुलं सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळी शाळेत जाण्यासाठी या बसमध्ये जवळपास १५ विद्यार्थी होते. बसला आग लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांचा जीव कासावीस झाला. आपली मुलं सुखरूप असतील या चिंतेत पालक होते. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेने सर्व विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर काही वेळातच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

पार्किंग सोडून महामार्गावर थांबलेल्या स्कूल बसचा अपघात

लातूरच्या किड्स इन्फो पार्क या खाजगी शाळेसमोर देखील स्कूल बस आणि काळी पिवळी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, शाळेसमोरच महामार्गाच्या बाजूला अनधिकृतपणे स्कूल बस उभी केल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय.

तर या अपघातात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतील 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना लातूरच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Madhya Pradesh
Mumbai Crime News: गर्लफ्रेंडने शॉपिंगसाठी 1 लाख मागितले; टेंन्शनमध्ये तरुणाने थेट जीवनच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com