FM Radio Center In Byculla
FM Radio Center In BycullaSaam TV

FM Radio Center In Byculla: चक्क महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! भायखळा जिल्हा कारागृहात "FM रेडीओ सेंटर" स्थापन

FM Radio Center: विदेशी कैद्यांसोबत चर्चा केली असता विदेशी कैद्यांनी कारागृहात ई-मुलाखत व इतर सोईसुविधा सुरु केल्याबददल कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले. कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यतील बेदी बंदीस्त असतात.
Published on

Byculla:

मनोरंजनाची मेजवानी प्रत्येकालाच आवडते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या रोजच्या व्यस्त जीवनापासून विरंगुळा म्हणून मनोरंजन हवे असते. यासाठी कोणी सोशल मीडिया, तर कोणी टीव्ही आणि फोनचा वापर करतात. अशात भायखळा जिल्हा कारागृहामध्ये थेट कैद्यांच्या मनोरंजनासाठी एक उपक्रम राबवण्यास सुरूवात झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

FM Radio Center In Byculla
Police Detained MLA Rohit Pawar: नागपूरमध्ये संघर्ष यात्रेदरम्यान मोठी झटापट, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भायखळा जिल्हा कारागृहामध्ये बंदी असलेल्या पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरिता "FM रेडीओ सेंटर" कक्ष स्थापन करण्यात आले आहे. सदर रेडीओ सेंटरचे उद्धाटन दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. या एफएम रेडीओ सेंटरमुळे कारागृहातील सर्वांचेच मनोरंजन होत आहे.

उद्धाटन सोहळ्यावेळी अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग उपस्थित होते. सदर FM रेडीओ सेंटरमध्ये कारागृहातील महीला कैदी श्रध्दा चौगुले यांनी FM सेंटरमध्ये रेडीओ जॅकीची भूमिका पार पाडली.

यावेळी श्रध्दा चौगुले यांनीच अमिताभ गुप्ता यांची रेडीओ FM वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा व सोईसुविधेबाबत चर्चा केली. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी FM सेंटरवरुन कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कैद्यांना देण्यात आलेल्या सोईसुविधा व यापुढे देण्यात येणा-या सोईसुविधेबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.

तसेच विदेशी कैद्यांसोबत चर्चा केली असता विदेशी कैद्यांनी कारागृहात ई-मुलाखत व इतर सोईसुविधा सुरु केल्याबददल कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले. कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यतील बेदी बंदीस्त असतात. कारागृहात येणा-या प्रत्येक कैद्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते.

आपला परिवार, आपले भविष्य, आपली केस याबाबत नेहमी मनात द्वंध्द चालू असते. त्या विचारामुळे प्रत्येक कैद्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. यापासून थोडासा विरंगुळा म्हणून कैद्यांना सकारात्मतेकडे नेण्याकरीता कारागृहात FM रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.

FM Radio Center In Byculla
Dombivali Crime: सराईत दोन साखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com