Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कार आणि ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Car Accident News : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात बुंदेलखंड द्रुतगती मार्गावर भीषण अपघात. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी आहे. चालकाला डुलकी लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
BANDA EXPRESSWAY ACCIDENT: FOUR FROM SAME FAMILY KILLED IN TRAGIC CRASH
BANDA EXPRESSWAY ACCIDENT: FOUR FROM SAME FAMILY KILLED IN TRAGIC CRASHSaam Tv
Published On
Summary
  • बुंदेलखंड एक्सप्रेसवेवर स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात

  • एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

  • चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

  • पोलिस व प्रशासनाच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात बुंदेलखंड द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. धक्कादायक म्हणजे हे चौघेही एकाच कुटुंबातील असल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या तत्परतेने तातडीने वाहतूक सुरळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कोतवाली देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. स्कॉर्पिओ गाडीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. हे सर्वजण आझमगड जिल्ह्यातील रामगड येथील रहिवासी असून कबरईकडे जात होते. दरम्यान, गाडीने मागून मालवाहू ट्रकला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला.

BANDA EXPRESSWAY ACCIDENT: FOUR FROM SAME FAMILY KILLED IN TRAGIC CRASH
Bank Closed : SBI कर्मचाऱ्यांचा संप! सलग ४ दिवस बँका बंद राहणार

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये स्कॉर्पिओ चालकाचाही समावेश आहे. अपघातात एक २० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी कानपूर येथे हलवण्यात आले आहे.

BANDA EXPRESSWAY ACCIDENT: FOUR FROM SAME FAMILY KILLED IN TRAGIC CRASH
Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत वाहतूक सुरळीत केली.

BANDA EXPRESSWAY ACCIDENT: FOUR FROM SAME FAMILY KILLED IN TRAGIC CRASH
Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

जिल्हाधिकारी अमित असेरी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, जखमी तरुणीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक पलाश बन्सल यांनी प्राथमिक चौकशीत स्कॉर्पिओ चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com