MBBSच्या २ विद्यार्थ्यांचा दुचाकीवरून अपघात, डोकं अन् तोंडातून रक्तस्त्राव, तासभर वेदनेने तडफडत होते

Agra–Mathura Road Crash: उत्तर प्रदेशातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू. तरूणांना वेळीच कोणतीही मदत न मिळाल्यानं कुटुंबाचा संताप.
Agra–Mathura Road Crash
Agra–Mathura Road CrashSaam
Published On

आग्रा - मथुरा महामार्गावरून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. एनएन मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या तृतीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवरून जात होते. यादरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले. दोन्ही विद्यार्थ्यांचे डोके दुभाजकावर जोरात आदळले. यामुळे डोक्यावरील हेल्मेट तुटले. तसेच दोन्ही विद्यार्थी रस्त्यावर कोसळले. या अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

हरिपर्वत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघाताची भीषण घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही विद्यार्थी दुचाकीवरून मथुराच्या दिशेनं जात होते. आयएबीटी पुलाजवळ तरूणाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोन्ही विद्यार्थी जमिनीवर कोसळले. यामुळे विद्यार्थ्यांचे डोके दुभाजकावर आदळले. गंभीर दुखापतींमुळे त्यांच्या तोंडातून आणि डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला.

Agra–Mathura Road Crash
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का; बड्या महिला नेत्याचं भाजपात प्रवेश, ऑपरेशन लोटसला यश

अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी अधिकची चौकशी केली. मृतांची ओळख पटली आहे. सिद्ध गर्ग (वय वर्ष २२) आणि तनिष्क गुप्ता (वय वर्ष २२) असे मृत तरूणांची नावे आहेत.

Agra–Mathura Road Crash
'आंचल माझी मुलगी नाही तर..' लेकाच्या मृत्यूनंतर सक्षमची आई काय म्हणाली? गुणरत्न सदावर्तेंकडे केली मोठी मागणी

दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला कळताच त्यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. मुलाचा मृतदेह पाहून विद्यार्थ्यांना धक्काच बसला. या दुर्देवी अपघातानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सध्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. एसओ हरिपर्वत नीरज शर्मा म्हणाले की, 'हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास केला जाईल. वाहन चालकाची ओळख पटवून कारवाई केली जाईल'.

Agra–Mathura Road Crash
लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

या घटनेबाबत सिद्ध गर्ग याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. 'दोन्ही मुले एक तास रस्त्यावर वेदनेने विव्हळत पडून होते. जर कुणी पुढाकर घेऊन दोघांना रूग्णालयात नेले असते तर, आज त्यांचे प्राण वाचले असते. ना पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले, ना स्थानिकांनी तरूणांना रूग्णालयात नेले', असं सिद्धचे वडील म्हणाले.

Agra–Mathura Road Crash
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा MMS व्हिडिओ लीक; तरूणासोबतचे १९ मिनिटं कॅमेऱ्यात कैद, तरूणी म्हणाली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com