आखाती युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली असताना आता अमेरिकेच्या संसदेने रशियावर कडक निर्बंध लादणारे विधेयक मंजूर केलं आहे. मात्र यामुळे भारताची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 100% पर्यंत शुल्क लावू शकतात, ज्यामध्ये भारत आणि चीनचाही समावेश आहे. रशियन अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवून युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चर्चेच्या टेबलवर आणणं हा यामागचा मुख्य हेतू असला, तरी यामुळे भारताची अडचण होण्याची शक्यता आहे. भारतावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूयात...
भारतावर काय परिणाम होणार?
देशांवर 100% टॅरिफ लावण्याचे ट्रम्प यांना अधिकार
रशियाकडून तेल, वायू खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारतही
रशियाच्या कोंडीसाठी अमेरिका भारतावर 100% टॅरिफ लावू शकतो
भारतावर 100% टॅरिफचा निर्णय झाल्यास इंधन महागणार
भारताला तेलासाठी नवीन पर्याय शोधावे लागू शकतात
भारतीय कंपन्यांना निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो
भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता वाढेल
रशियावरील निर्बंधांचं विधेयक काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलय. आता त्यावर केवळ ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. यामुळे कोणत्या भारतीय उद्योगांना फटका बसणार? ते पाहूया
कोणत्या भारतीय उद्योगांना फटका बसणार?
इंधन क्षेत्र
इलेक्टॉनिक्स वस्तू
हिरे, आभूषणं
जेनरिक औषधं
कपडे आणि टेक्सटाईल
टॅरिफ वाढीचा भारताच्या आर्थिक विकासाच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय या विधेयकामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये अनिश्चितता आणखी वाढू शकते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरून भारतीय वस्तूंवर 25% परस्पर शुल्काव्यतिरिक्त 25% अतिरिक्त टॅरिफ लादले होते. मात्र, फेब्रुवारी 2026 मध्ये हे शुल्क 18% पर्यंत कमी केले गेले. मात्र आता पुन्हा 100 टक्के टेरिफची टांगती तलवार भारतावर आहे. यावर आता मोदी सरकार यावर कशी रणनिती आखणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.