US President Election: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण आहे पुढे?

US President Election Survey: अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील स्पर्धा खूपच रंजक बनली आहे. डोनाल्ड टम्प विजयापासून दूर राहतात का पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात, हे पाहूया.
US President Election: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण आहे पुढे?
US President Election
Published On

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलंय. २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांबाबत अमेरिकेत प्रचंड खळबळ उडालीय. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यातील लढत खूपच रोचक झालीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार घोषित करण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होणार आहे.

या निवडणुकीसंदर्भात एक सर्व्हे समोर आला असून यात कमला हॅरिस पिछाडीवर पडल्याचं दिसत आहे. अमेरिकेतील वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलद्वारे हा सर्व्हे करण्यात आलाय. या सर्व्हेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांना ४९ टक्के मते मिळाली आहेत तर कमला हॅरिस यांना ४७ टक्के मते मिळाली आहेत.

याआधी ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यापेक्षा ६ टक्क्यांनी पुढे होते, मात्र त्यांनी उमेदवारी सोडल्यानंतर हा फरक केवळ २ गुणांवर आलाय. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, इतर उमेदवारांचा समावेश केला असता कमला हॅरिस यांना ४५ टक्के, ट्रम्प यांना ४४ टक्के आणि रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांना केवळ ४ टक्के पाठिंबा मिळालाय. तर ५ टक्के लोकांचा कोणत्याही उमेदवारावर विश्वास नाहीये.

दोन्ही उमेदवार दरम्यान अमेरिकेच्या जनतेला आपण चांगले उमेदवार असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. कमला हॅरिस यांना ४६ टक्के लोकांनी अनुकूल मानले तर ५२ टक्के लोकांनी त्यांना प्रतिकूल मानले आहे. ट्रम्प यांच्या तुलनेत कमला हॅरिस अर्थव्यवस्था, परराष्ट्र संबंध आणि गुन्हेगारी या मुद्द्यांवर अधिक भक्कम आहेत. गर्भपातासारख्या मुद्द्यांवर हॅरिसला ५१ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. तर ट्रम्प यांना ३३ टक्के लोकांचा पाठिंबा मिळालाय. सर्व्हेनुसार ४८ टक्के लोकांच्या मते, ट्रम्प यांचे वय ७८ वर्ष असल्याने ते अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसण्यास आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी ते वृद्ध आहेत. तर कमला हॅरिस ह्या ५९ वर्षाच्या असल्याची चिंता देखील अमेरिकेच्या जनतेने व्यक्त केलीय.

US President Election: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण आहे पुढे?
US Presidential Election : भारतीय वंशाची महिलाच असणार US अध्यक्षपदाची उमेदवार? माजी राष्ट्राध्यक्षांचाही मिळाला पाठिंबा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com