US Presidential Election: मोठी बातमी! जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग मोकळा?

Joe Biden : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून जो बायडन बाहेर पडले आहेत. त्यांनी रविवारी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली.
मोठी बातमी! जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग मोकळा?
US Presidential ElectionSaam Tv
Published On

जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बायडन यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अलीकडेच जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिबेट झाली होती. ज्यात ट्रम्प यांनी बाजी मारली.

या डिबेटदरम्यान बायडन यांना डुलकी लागली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर त्यांच्यावर मोठ्या पमाणात टीकाही होत होती. यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक डेमोक्रॅटिक खासदारांनीही बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा सल्ला दिला होता.

मोठी बातमी! जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग मोकळा?
Wipro CEO Salary: विप्रोच्या सीईओला मिळणाऱ्या पगारात येतील 2 प्राइव्हेट जेट, सॅलरी जाणून व्हाल थक्क; कोण आहेत श्रीनिवास पल्लीया?

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आणि घोषणा केली की, ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेत आहेत. काही काळापासून बायडन यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता, असं बोललं जात आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या पत्रात बायडन यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन नागरिकांचे आभार मानले आहेत. आपण आपली उमेदवारी मागे घेत असून पुढील आठवड्यात मीडियासमोर आपले मत मांडणार असल्याचे बायडन यांनी सांगितले. बायडन यांनी त्यांच्या निर्णयामागे देश आणि पक्षाचे हित असल्याचे सांगितले.

मोठी बातमी! जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग मोकळा?
Assembly Election: महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? महायुती चेहऱ्याविना लढणार?

आता ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस

जो बायडन यांनी अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. पक्षाकडून लवकरच हॅरिस यांच्या नावाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक डेमोक्रॅटिक खासदारांनीही कमला हॅरिस यांना आधीच आपला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांची लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com