Wipro CEO Salary: विप्रोच्या सीईओला मिळणाऱ्या पगारात येतील 2 प्राइव्हेट जेट, सॅलरी जाणून व्हाल थक्क; कोण आहेत श्रीनिवास पल्लीया?

Who Is Srinivas Pallia : विप्रोचे नवीन सीईओ श्रीनिवास पल्लिया सध्या आपल्या पगारामुळे खूपच चर्चेत आहेत. पल्लिया यांचा पगार इतका आहे की, त्यात सहज दोन प्रायव्हेट जेट खरेदी करता येईल.
विप्रोच्या सीईओला मिळणाऱ्या पगारात येतील 2 प्राइव्हेट जेट, सॅलरी जाणून व्हाल थक्क; कोण आहेत श्रीनिवास पल्लीया?
Wipro CEO SalarySaam Tv
Published On

श्रीनिवास पल्लिया हे अलीकडेच विप्रोचे नवीन सीईओ झाले आहेत. सध्या ते त्यांच्या पगारामुळे खूपच चर्चेत आहेत. पल्लिया यांचा पगार इतका आहे की, त्यात सहज दोन प्रायव्हेट जेट खरेदी करता येईल. समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास पल्लिया यांना 60 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 50 कोटी इतका पगार आहे. हा त्यांचा वार्षिक पॅकेज आहे. स्वतः कंपनीने ही माहिती दिली आहे.

थियरी डेलापोर्ट यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी एप्रिलमध्ये पल्लिया यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. विप्रोचे माजी सीईओ थियरी डेलापोर्ट यांना 80 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं वार्षिक पॅकेज दिलं जात होतं.

विप्रोच्या सीईओला मिळणाऱ्या पगारात येतील 2 प्राइव्हेट जेट, सॅलरी जाणून व्हाल थक्क; कोण आहेत श्रीनिवास पल्लीया?
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर गडगडले; वाचा मुंबई आणि पुण्यातला भाव

विप्रोने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, पल्लिया यांचा वार्षिक पगार 35 लाख डॉलर्स ते 60 लाख डॉलर्स असेल. हे पॅकेज दोन प्रायव्हेट जेट खरेदी करता येईल, इतके आहे. एका छोट्या आणि हलक्या प्रायव्हेट जेटची किंमत 20 कोटी रुपये आहे. पल्लिया हे 7 एप्रिल 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचा कार्यभार सांभाळणार आहेत.

कोण आहेत श्रीनिवास पल्लिया?

श्रीनिवास पल्लिया यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून अभियांत्रिकीची पदवी आणि आयटीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचा अभ्यास केला. ते 1992 पासून विप्रोशी संबंधित आहेत.

विप्रोच्या सीईओला मिळणाऱ्या पगारात येतील 2 प्राइव्हेट जेट, सॅलरी जाणून व्हाल थक्क; कोण आहेत श्रीनिवास पल्लीया?
Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगारात किती वाढ होणार? वाचा

कंपनीत त्यांनी अनेक मोठी पदे सांभाळली आहेत. श्रीनिवास कंपनीच्या कंझ्युमर बिझनेस युनिट आणि बिझनेस अॅप्लिकेशन सर्व्हिसेसचे जागतिक प्रमुख देखील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com