Wipro Enter in Food Package Market: अंबानी-अदानी आणि टाटाला मिळणार टक्कर, पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये 'विप्रो'ची एंट्री

Food Package Market: अंबानी-अदानी आणि टाटाला मिळणार टक्कर, पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये 'विप्रो'ची एंट्री
Wipro
Wipro Saam TV

Wipro Enter in Food Package Market: विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंग या देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोची ग्राहकोपयोगी वस्तू कंपनीने पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अदानी-अंबानी आणि टाटा यांना थेट स्पर्धा देण्यासाठी विप्रोने मोठी घोषणा केली आहे.

कंपनीने केरळच्या पॅकेज्ड फूड ब्रँड Brahmins चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. यामध्येच येत्या काही दिवसांत या बाजारात प्राइस वॉर पाहायला मिळू शकते. हा व्यवहार किती प्रमाणात पूर्ण झाला, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र ही सर्व दिलं कॅशमध्ये होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Wipro
Apple Store iPhone Stolen: चोरांची ‘मनी हाईस्ट’ स्टाईल; बाथरूमखाली बोगदा खणून अॅपल स्टोअरमध्ये घुसले; 4.10 कोटी रुपयांचे 436 IPhone लंपास

अझीम प्रेमजींची कंपनी विप्रो 5 लाख कोटी रुपयांच्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपला पोर्टफोलिओ सतत वाढवत आहे. गुरुवारी विप्रो कंझ्युमर केअरच्या वतीने घोषणा करताना असे सांगण्यात आले की, त्यांनी Brahmins च्या अधिग्रहणासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. (Latest Marathi News)

विप्रोने Brahmins च्या संपादनाची घोषणा करण्यापूर्वी 2022 मध्ये गेल्या वर्षी Nirapara चे अधिग्रहण केले होते आणि भारताच्या पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपली भूमिका आणखी मजबूत केली होती.

Wipro
Raj Thackeray News: 'दादा ज्याचं जळतं त्यालाच कळतं...' सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारत साधला निशाणा

या कंपनीशी होणार स्पर्धा

विप्रो कंझ्युमर केअर, साबण, तालक, संतूर आणि यार्डले सारख्या वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छता उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या, पॅकेज्ड फूड क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी बनण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. मात्र या क्षेत्रातील आधीच प्रबळ असलेल्या अदानी विल्मार, रिलायन्स रिटेल आणि टाटा कंझ्युमर लिमिटेड यांच्याशी थेट स्पर्धा करावी लागेल.

विप्रोने जो Brahmins ब्रँड विकत घेण्याची घोषणा केली आहे ती केरळमधील जुन्या आणि दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. हा ब्रँड पारंपारिक शाकाहारी, मसाला मिक्स आणि रेडी टू कू उत्पादने तयार करतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com