युद्ध पुन्हा पेटण्यास होर्मूझ कळीचा मुद्दा, अमेरिकन नौदलाकडून कडक नाकेबंदी

Us Iran Conflict Hormuz Strait War Risk: इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता दोन्ही देशांमध्ये होर्मुझवरून पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. हे युद्ध पेटण्यास होर्मुझ कसा कळीचा मुद्दा ठरलाय?
US naval forces patrol the Strait of Hormuz amid rising tensions with Iran over strategic oil routes.
US naval forces patrol the Strait of Hormuz amid rising tensions with Iran over strategic oil routes.saam tv
Published On

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांतील शांतता चर्चादेखील होर्मुझवरून फिसटकलीये. एव्हंढच नाहीतर इराणनं अमेरिकेच्या य़ुद्धबंदीला धुडकावून मागे न हटण्याचे मनसुबे उघड केलेत. त्यातच अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीला झुगारून इराणनं आपल्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेरही काढलंय. आणि अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीला शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याचं सांगत पलटवारदेखील केला. त्यामुळे ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये पुन्हा इराणविरोधात नवा डाव टाकलाय. आता ट्रम्प यांनी होर्मुझवरील नियंत्रण आणखी घट्ट करण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिलेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सुरुंग त्वरित हटवण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. इतकंच नाहीतर त्यांनी अमेरिकन सैन्याला होर्मुझमध्ये जलसुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणच्या जहाजांवर गोळीबार करून नष्ट करण्याचे आदेशही दिलेत. यासोबतच अमेरिकन नौदलाची नाकेबंदी आणखी मजबूत करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय. यापुढे जाऊन सर्वात गंभीर पाऊल म्हणजे अमेरिकेकडून आता इराणची तेल उत्पादने थांबवण्यासाठी तयारी करण्यात आलीये.

खरंतर, सागरी नाकेबंदी जाहीर केल्यानंतर आता ट्रम्प यांनी इराणचं आर्थिक कबंरडं मोडण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.

खरंतर, होर्मुझमधून जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार चालतो. त्यामुळे हा जलमार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशातच आता ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट इशारा दिलाय. त्यामुळे होर्मुझमधील व्यापार पूर्ण ठप्प होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर जगावर पुन्हा एकदा इंधनटंचाईचं संकट गडद होऊन जगभरात तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इराणची आर्थिक कोंडी करणाऱ्या ट्रम्प यांच्या आदेशामुळे पुन्हा जग युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती निर्माण झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com