केंद्रीय लोकसेवा आयोगने (UPSC) भारतीय सांख्यिकी सेवा (IES) परीक्षा 2023 आणि भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2023 (UPSC IES ISS Result 2023) चे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. आयोगाने बुधवार, 24 जानेवारी 2024 रोजी दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर केले.
यासोबतच यूपीएससीने दोन्ही परीक्षांमध्ये निवडलेल्या एकूण 53 उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. भारतीय आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षांना बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यूपीएससीद्वारे जारी केलेल्या आइईएस परीक्षा 2023 निकाल (UPSC IES Result 2023) अधिसूचनेनुसार, यावेळी निश्चल मित्तल परीक्षेत अव्वल ठरला आहे. यानंतर अदिती झा दुसऱ्या क्रमांकावर आणि पूर्णिमा सुदेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Latest Marathi News)
त्याचप्रमाणे, यूपीएससीने प्रकाशित केलेल्या आयएसएस परीक्षा 2023 निकाल (UPSC ISS Result 2023) अधिसूचनेनुसार, निखिल सिंग या परीक्षेत देशात पहिला आला आहे. यानंतर जान्हवी पटेल दुसऱ्या क्रमांकावर आणि विजय लढा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांचा निकाल तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती अशा उमेदवारांकडून प्रलंबीत असलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेपर्यंत आणि या उमेदवारांची तात्पुरती स्थिती स्पष्ट करेपर्यंत आयोग जारी करणार नाही. या उमेदवारांच्या तात्पुरत्या निकालाची मुदत अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच वैध राहील. या कालावधीत आयोगाला आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.