Gaziabad Viral Video
Gaziabad Viral VideoSaamtv

Ghaziabad Viral video: चुकीला माफी नाही! पोलिसांनीच मोडला नियम, तरुणींनी शिकवला चांगलाच धडा; चक्क पाठलाग करुन...

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील तरुणींचे नेटकऱ्यांनी जोरदार कौतुक केले आहे.
Published on

Gaziabad Viral VIdeo: वाहन चालवताना पोलिसांची भिती वाटणे साहजिक आहे. कारण एखादा नियम जरी मोडला तरी पोलिसांकडून होणारी कारवाई अटळ असते. मात्र अनेकदा इतरांना कायद्याचे आणि नियमांचे शिक्षण देणारे पोलिसचं अनेकदा नियम मोडताना दिसतात. अशावेळी त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये नियम मोडणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी चांगलाच धडा शिकवला आहे.

Gaziabad Viral Video
Gautam Adani Meets Sharad Pawar: मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

याबाबत अधिक माहिती अशी की, इतरांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करायला सांगणारे पोलिसच अनेकदा ते नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. या सबंधित अनेक बातम्या आपण वाचत असतो, ज्यामध्ये पोलिसचं नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन पोलीस हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहेत. पण व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे, हेल्मेटशिवाय बाईक चालविणाऱ्या पोलिसांचा पाठलाग करत दोन मुलींनी त्यांना ‘हेल्मेट का घातलं नाही’ असा जाब विचारला आहे.

Gaziabad Viral Video
PM Kisan Yojana: धक्‍कादायक प्रकार..पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याला दाखवले मृत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुली स्कूटीवरुन पोलिसांना हेल्मेट न घालता गाडी का चालवत आहात? असा प्रश्न विचारत आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाझियाबादमधील (Gaziabad) आहे. दोन मुलींनी पोलिसांना विना हेल्मेट दुचाकीवरून जात असल्याचे पाहताच मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि पोलिसांना जोरजोरोत तुमचं हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न विचारला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच गाझियाबाद पोलिसांनी ट्रॅफिक हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली आहे. पोलिसांवर कारवाई झाल्याचं पाहून नेटकऱ्यांनी यूपी (Uttar Pradesh) पोलिसांचं कौतुक केलं आहे.

Gaziabad Viral Video
Mumbai Pune Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “या मुली खूप धाडसी आहेत, त्यांनी पोलिसांनाच धडा शिकवला.” तर आणखी एकाने, पोलिसांनीदेखील नियमाचं पालन करायलाच हवं, असं लिहिलं आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालय गाझियाबादच्या ट्विटर हँडलवरून हेल्मेट न घातलेल्या पोलिसांवर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com