PM Kisan Yojana: धक्‍कादायक प्रकार..पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याला दाखवले मृत

धक्‍कादायक प्रकार..पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याला दाखवले मृत
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या लखमापूर येथील (Farmer) शेतकरी व माजी सरपंच रमेश केदा बच्छाव यांना पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) पोर्टलवर मृत घोषित करून पीएम किसान योजनेचे मिळणारे अनुदान गोठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडीस घडला आहे. (Breaking Marathi News)

PM Kisan Yojana
Dhule News : मेणबत्ती कारखाना स्फोट प्रकरण; तीन जण ताब्‍यात, पोलीस प्रशासनातर्फे तपासाला गती

शासनाच्या नियमाप्रमाणे पी. एम. किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करूनही अनुदान मिळत नव्‍हते. यामुळे संबंधित विभागाकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रमेश बच्‍छाव या शेतकरीला ७ जून २०२२ पर्यंत पीएम किसान योजनेचे अनुदान नियमित मिळत होते. त्यानंतर अनुदान येणे बंद झाले.

PM Kisan Yojana
Railway Crime: धावत्‍या रेल्‍वेतून लांबवायचा महिलांचे मंगळसूत्र; चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक

पोर्टल तपासले असता समोर आला प्रकार

शासनाच्या अटीप्रमाणे बच्‍छाव यांनी आधार कार्ड लिंक केले. यानंतर देखील अनुदान येत नसल्याने पोर्टलवर चौकशी केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्याने बच्छाव यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार कोणी केला याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com