Gautam Adani Meets Sharad Pawar: मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, दोन तास झाली चर्चा
Gautam Adani Meets Sharad Pawar
Gautam Adani Meets Sharad PawarSaam Tv

Gautam Adani Meets Sharad Pawar : उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. सिल्वर ओकवर ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्याव माहिती समजू शकलेली नाही.

Gautam Adani Meets Sharad Pawar
Cash Limit at Home : घरात किती रोख रक्कम ठेवता येते? जाणून घ्या काय आहेत सरकारचे नियम

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या समूहाच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं होतं. यातच आता या दोघांची भेट झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीत दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली. या दोघांमध्ये राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

तत्पूर्वी शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, ''पूर्वी सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. या समूहांचे देशाच्या विकासातील योगदान सर्वांना माहीत आहे.''

Gautam Adani Meets Sharad Pawar
Tim Cook Meets Pm Narendra Modi : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, भारतात करणार गुंतवणूक, ट्वीट करत दिली माहिती

या मुलाखतीत पवार म्हणाले होते की, ''आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे.''

देशाला त्याची गरज आहे. या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, असंही ते म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com