

Trending Uncle Dance Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सर्वांनाच माहितेय लग्नसोहळ्यात डान्स करण्याची एक वेगळीच क्रेझ असते. स्टेजवर डीजे सुरु झाला की, लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत डान्स फ्लोअरवर धाव घेतात.अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट हसतील, यात काही शंका नाही. (Uncle Dance Viral Video)
व्हायरल होत असलेला या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका काकांनी 'यार मेरा तितल्या वर्गा' या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचे दिसत आहे. या काकांच्या डान्स मूव्ह आणि एक्सप्रेशन पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल यात काही शंका नाही. काकांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये या काकांनी कुर्ता-पायजामा परिधान केला आहे.
एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओची इंटरनेटवर तुफान चर्चा सुरु आहे. व्हिडिओला झपाट्याने 3 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इंटरनेट वापरकर्ते या काकांचा उत्साही डान्स व्हिडिओ पाहून त्यांच्या डान्सचे कौतुकही करत आहेत. एका यूजरने म्हटले की, "प्रत्येकाणे असे आनंदी राहायला हवे". आणखी एका युजरने लिहिले आहे की, "काकाची बॉडी जरी थोडी जुनी असेल, पण इंजिन एकदम नवीन आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "वय फक्त एक संख्या आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.