MVA Morcha : मोर्चाला सुरूवात होण्याआधीच कार्यकर्ते पोलिसांमध्ये बाचाबाची, पाहा नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याआधी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे.
Maha vikas aghadi
Maha vikas aghadi Saam Tv
Published On

Mumbai : राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्ये महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद अशा विविध कारणांसाठी मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याआधी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Maha vikas aghadi
Gram Panchayat Elections 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणास; उद्या मतदान

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) दिनांक १७ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना तसेच कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या महामोर्चात सहभागी होणार आहेत. सोबतच या मोर्चात राज्यभरातील लाखो कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

मोर्चासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे मोठी गर्दी निर्माण झाली आहे. यामुळेच पोलिस आणि नेत्यांमध्ये खटकेही उडत आहेत. शिवसेनेचे (Shivsena) पुण्यातील नेते मोहन यादव यांची गाडी काढायला सांगितल्यावरुन हा वाद सूरू झाला असून माझीच गाडी का काढू असे म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. या वादात शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्याचे दिसत आहे.

Maha vikas aghadi
Sanjay Raut : सरकारने विरोधी पक्षांना भाषणही लिहून द्यावे; मोर्चावरील अटींवरून राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला आता सुरूवात झाली असून प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला भाजपाकडून माफी मागो आंदोलन करण्यात येणार आहे. सुषमा अंधारेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांविरोधात हे आंदोलन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com