Sanjay Raut News : भाजपच्या (BJP) नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येत आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांनी घातलेल्या अटींवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Raut Latest News)
हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, या अटींपेक्षाच या सरकारने आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते. नेत्यांना भाषण लिहूनच दिली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे तुम्ही त्यांना अटी घालता हे योग्य नाही.
सरकारमध्ये कोणी महाराष्ट्र प्रेमी उरले असतील तर त्यांनी आजच्या मोर्चात सहभागी व्हावे. सत्तेत असणाऱ्या लोकांमधील महाराष्ट्रप्रेमी हे खोक्याच्या वजना खाली दबले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आज होणारा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. या बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाणे बंद कसला करताय? कशासाठी करताय? तुमच्यात जर महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल तर ठाण्याती बंद मागे हा बंद मागे घेऊन आमच्या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांची ताकद फक्त पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट पुरतीच मर्यादित आहे, अशी टीका केली.
खरं तर शिवरायांचा अवमान या प्रश्नावर महाराष्ट्र बंद करायला हवा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा फुल्यांचा अपमान झाला. त्याविरोधात बंद पुकारणार होतो. पण आम्ही तो बंद पुढे ढकलला. सध्या आम्ही मोर्चात आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा राज्यपाल राजभवनात बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबडेकारांचा अवमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसला. एक दिल्लीत बसला आणि तुम्ही म्हणताय आम्हाला काम नाही? यांचा मेंदू आहे कुठे? परवा दिल्लीत मेंदू गहाण ठेवून आलात का? शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणे याचा अर्थ काम नाही? असा संतापही राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.