Maharashtra Politics : शिंदे गटाचे 3 आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

शिंदे गटातील तीन आमदार आमच्या संपर्कात आहे. तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे.
Eknath shinde And Devendra fadnavis
Eknath shinde And Devendra fadnavisSaam TV
Published On

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यानंतर शिवसेनेत (Shivsena) फुट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. यानंतर इतर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते हे पक्षांतर करू लागले. एकीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Eknath shinde And Devendra fadnavis
Nanded News:अरेरे! लग्नातलं जेवण बेतलं जीवावर; १५० व्यक्तींना विषबाधा

शिंदे गटातील तीन आमदार आमच्या संपर्कात आहे. तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Eknath shinde And Devendra fadnavis
CNG Price Hike : वाहन चालकांच्या खिशाला बसणार झळ, १४ महिन्यात तब्बल ७५% दरवाढ; काय आहे कारण?

आमदारांवर विश्वास असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल असे देखील मिटकरी म्हणाले. आमच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही अस देखील अमोल मिटकरी यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com