India Pakistan Tension: संयुक्त राष्ट्रानं पाकला फटकारलं जगभरात पाकिस्तानची नाचक्की सुरुच युएनचं भारताला शांत राहण्याचं आवाहन

World Unites Against Pakistan: भारतीयांच्या रक्तानं माखलेले हात घेऊन पापी पाकिस्तान आता जगभरात क्षमेची भीक मागतोय. पण जिथे जाईल तिथे पाकला हुसकावून लावण्यात येतंय.. आता तर 193 देशांसमोर संयुक्त राष्ट्रात पाकची कशी नाचक्की झालीये. पाहुया, या रिपोर्टमध्ये...
UN rebukes Pakistan
UN rebukes Pakistansaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भडकलेल्या भारताला शांत करण्यासाठी पाकनं अनेक देशांचे, इस्लामिक राष्ट्रांचे आणि संयुक्त राष्ट्राचे उंबरे झिजवले. मात्र पाकिस्तानच ेरक्तानं माखलेले हात धुवायला कोणीही तयार नाही. पाकला जगभरात सगळ्यांनी हाकलवून लावलं होतं आणि आता तर संयुक्त राष्ट्रानं देखील पाकिस्तानला फटकारलंय,,संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी नेमकं काय म्हटलंय. पाहुया,

ऐकलंत, भारताचा राग शांत करुन आम्हाला वाचवा अशी याचना करण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानं कसं सुनावलं. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे असं खुद्द राष्ट्रसंघाला देखील वाटतंय. त् त्यामुळे आता पहलगाम हल्ला घडवणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतही सज्जयं. कारण आजवर भारतानं युएनच्या आवाहनाचा कायम आदरच केलाय.

आजवर ३ युद्धात भारतानं युएनच्या मध्यस्थीचा आणि आवाहनाचा आदर करत अंमलबजावणी केलीये. आता तर खुद्द संयुक्त राष्ट्रानं हल्ल्यातील जबाबदारांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलंय. आंतराष्ट्रीय पातळीवर पाकनं पोसलेल्या दहशतवादाच्या विरोधात सगळं जग एकवटलं असून एकएका दहशतवाद्याला ठेच्चून काढण्याचं आव्हान आता भारतानं स्विकारलंय. आता वेळ झालीये युद्धाचा बिगुल वाजताच पाकला नेस्तानाबूत करुन इस्लामाबादमध्ये तिंरगा फडकवण्याची ....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com