Shocking : भीषण दुर्घटना! हॉटेलमध्ये ४ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Madhya Pradesh Ujjain Hotel Tragedy News : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या देवास रोडवरील श्रीगंगा हॉटेलमध्ये भीषण दुर्घटना घडली. फूड वेस्ट प्लांटच्या चेंबरमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू.
Madhya Pradesh Ujjain Hotel News
Madhya Pradesh Ujjain Hotel News AI Image
Published On: 
Summary
  • मध्य प्रदेशातील उज्जैनच्या श्रीगंगा हॉटेलमध्ये भीषण दुर्घटना

  • हॉटेलच्या फूड वेस्ट प्लांटच्या चेंबरमध्ये उतरलेल्या चार जणांचा मृत्यू

  • विषारी गॅस गळतीमुळे चौघांचा गुदमरून मृत्यू

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका हॉटेलमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. देवास रोडवरील श्रीगंगा हॉटेलमध्ये फूड वेस्ट प्लांटच्या चेंबरमध्ये उतरलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील देवास रोडवर श्रीगंगा हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागच्या बाजूला कचरा जमा करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक चेंबर तयार करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी एक कर्मचारी या चेंबरमध्ये काही कामासाठी उतरला होता. मात्र, तो बराच वेळ बाहेर आला नाही. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आणखी तीन जण चेंबरमध्ये उतरले. मात्र, चेंबरमध्ये विषारी गॅसमुळे आत गेलेले चारही जण बेशुद्ध पडले.

Madhya Pradesh Ujjain Hotel News
Weather Update : देशावर नव्या चक्रीवादळाचं संकट! २० राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल हवामान

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांना चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत वाहिद, मनोज, कमलेश आणि नितीन यांचा मृत्यू झाला आहे.

Madhya Pradesh Ujjain Hotel News
Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील कर्मचारी आणि बाहेरून कामासाठी आलेले काही लोक कचऱ्याच्या टाकीत उतरले होते. गॅस गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं . या दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीगंगा हॉटेल गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणात हॉटेल व्यवस्थापनाची निष्काळजी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे हॉटेलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.