Weather Update : देशावर नव्या चक्रीवादळाचं संकट! २० राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल हवामान

Weather Update Today News : बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने २० राज्यांना पावसाचा इशारा दिला असून महाराष्ट्रातील विदर्भासह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
Weather Update News
Weather Update News AI Image
Published On: 
Summary
  • बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची शक्यता

  • पुढील १२ ते १८ तास महत्त्वाचे

  • देशातील एकूण २० राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

गेले काही दिवस बंगालच्या उपसागरात थैमान घातलेल्या अर्णब चक्रीवादळाचा आता वेग मंदावला असून नवं चक्रीवादळ येणार असल्याची चाहूल लागली आहे. दरम्यान आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक सक्रिय होत असून, पुढील १२ ते १८ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील ही हवामान प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम देशातील अनेक भागांवर होऊ शकतो.

Weather Update News
Bank Update : SBI चं अकाउंट १ नोव्हेंबर पासून बंद होणार, नेमकं काय आहे सत्य?

२० राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाने देशातील एकूण २० राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात ताशी ४० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

Weather Update News
Gold Rate Today : सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, दिवाळीपूर्वी खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागांत पुढील काळात पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याशिवाय सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काळजी घ्यावी. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.