Crime News
Crime NewsSaam tv

Ujjain Case: अटक करण्याऐवजी त्याचा एन्काऊंटर केला पाहिजे होता, उजैन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

Ujjain Case: 'आरोपीला जगण्याचा अधिकार नाही, त्याला गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या वडिलांनी दिली आहे.
Published on

Ujjain News:

उज्जैनमधील १२ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. देशभरातून उज्जैन प्रकरणातील आरोपीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीच्या वडिलांनीही मुलाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. 'आरोपीला जगण्याचा अधिकार नाही, त्याला गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या वडिलांनी दिली आहे. (Latest Marathi News)

'आजतक'च्या वृत्तानुसार, उज्जैन प्रकरणातील आरोपी भरतच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलंय.'पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात का घेऊन गेले? त्याला तिथेच गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या. त्या पीडित मुलीच्या जागी माझी मुलगी जरी असती, मी अशीच इच्छा व्यक्त केली असती. या प्रकारचा गुन्हा करणाऱ्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही, असं बोलत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Crime News
Samruddhi Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; थरारक घटनेत २ ठार ३ जखमी

आरोपीचे वडील पुढे म्हणाले, 'माझ्या मुलाने उज्जैन शहरात लहान मुलीवर अत्याचार केल्याचं कळालं. त्याने मला याबाबत काही सांगितलं नाही. त्याची नेहमीसारखी दिनचर्या सुरू होती. घरात त्याने कोणाला संशय येईल, असं काहीच कृत्य केलं नाही'.

'मुलगी माझी असो किंवा दुसऱ्यांची असो. या प्रकारचं घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी द्यायला हवी. त्याच्यावर गोळ्या झाडल्या पाहिजे. आम्हाला या प्रकरणानंतर घराबाहेर पडण्यास लाज वाटत आहे. मी आता काय करू? मला काहीच कळत नाहीये. मी त्याच्या जागी असतो तर गुन्हा मान्य करून मेलो असतो. पोलिसांच्या हाती देखील लागलो नसतो, असेही ते म्हणाले.

'आमचा मुलगा रिक्षा चालक आहे. त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्या कृत्याची मला आधीच कल्पना होती. बातमी कळाल्यानंतर मी घरात खूपच चुकीचं घडल्याचं सांगितलं, असेही आरोपीचे वडील म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. अत्याचार झाल्यानंतर पीडिता मदतीसाठी अर्धनग्न अवस्थेत दारोदार फिरत होती. तरीही तिला कोणीही मदत केली नाही. या पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर मध्यप्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com